पाकव्याप्त काश्मीरमध्ये भूकंप; उत्तर भारतात जाणवले धक्के

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भूकंप; उत्तर भारतात जाणवले धक्के

राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील विविध भागात मंगळवारी संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र पाकव्याप्त काश्मीरमध्ये असल्याचे एका खासगी भूकंप निरिक्षण एजन्सीने स्पष्ट केले आहे. ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप होता. दरम्यान, या भूकंपामुळे कोणत्याही स्वरुपाच्या नुकसानीची माहिती समोर आलेली नाही.

 नवी दिल्ली, चंदीगड, काश्मीर तसेच पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादसह खैबर पख्तून प्रांतासह काही शहरांमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले. युरोपीअन मेडिटेरनीन सिस्मोलॉजिकल सेंटरने याची माहिती दिली आहे. पाकिस्तानच्या लाहोर प्रांतापासून उत्तर पश्चिम भागात १७३ किमी अंतरावर पीओकेत या भूकंपाचे केंद्र असल्याचे या एजन्सीने म्हटले आहे.


दरम्यान, उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर दिल्ली जवळील नोयडा येथे राहणाऱ्या अन्यन्या भट्टाचार्य नावाच्या एका मुलीने तिच्या घरामधील वस्तूंची झालेली हालचाल कॅमेरॅत टिपली असून याचा व्हिडिओ तिने ट्विटरवर पोस्ट केला आहे.


Web Title: Earthquake Of Magnitude 6 1 At Richter Scale Strikes 173 Km North West Of Lahore Pakistan
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com