रश्मी ठाकरे संपादक झाल्या अन् पहिल्याच अग्रलेखात भाजपला...

साम टीव्ही न्यूज
सोमवार, 2 मार्च 2020

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी 'सामना' या मुखपत्राच्या संपादकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आज (सोमवार) पहिल्याच अग्रलेखातून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा भाजपचे दादामिया असा उल्लेख केला आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी 'सामना' या मुखपत्राच्या संपादकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आज (सोमवार) पहिल्याच अग्रलेखातून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा भाजपचे दादामिया असा उल्लेख केला आहे.

विरोधी पक्ष भाजपला कायम प्रश्न करणाऱ्या शिवसेनेने आता संपादकपदाची धुरा बदलल्यानंतरही लक्ष्य केलेले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी सोडली होती. आता ही जबाबदारी रश्मी ठाकरे यांच्याकडे आलेली आहे. शिवसेनेचे मुखपत्र अशी ओळख असलेल्या सामनाचे संजय राऊत हे कार्यकारी संपादक आहेत.

शिवसेनेने आपल्या अग्रलेखात म्हटले आहे, की  भाजपचे दादामियां ‘इतिहास पुरुष’ कधीपासून झाले? त्यांना इतिहासाचे उत्खनन करण्याची इतकीच आवड असेल, तर पंचवीस वर्षांपूर्वी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ केल्याचे त्यांच्या लक्षात यायला हवे होते. ‘दादामियांसारख्या लोकांनी औरंग्याची पिशाचे कितीही उकरुन काढली, तरी महाराष्ट्राची शांतता भंग पावणार नाही, हे दादामियांनी पक्के लक्षात ठेवावे. असे अनेक दादामियां गोधड्या भिजवत होते, तेव्हा शिवसेना हिंदुत्व आणि राष्ट्रकार्यासाठी छातीचा कोट करुन लढत होती. दादामियां हे ध्यानात ठेवा! देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील ही मंडळी जे बोलतात आणि करतात त्यातून त्यांचे वैफल्य दिसून येते. दादांची पावलं फडणवीसांच्या पावलावर पडत आहेत. जिथे नको तिथे जीभ टाळ्याला लावत आहेत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे वंशज आहोत, औरंग्याचे नाहीत. त्यामुळे औरंगाबादचे नामांतर झालेच पाहिजे. आपण नक्की कोणाचे वंशज आहोत, हे त्यांनी सांगायलाच पाहिजे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची विटही रचली नाही, ना सावरकरांना भारतरत्न दिला. अयोध्येत रामाचं मंदिर सर्वोच्च न्यायालयाच्या कृपेने उभे राहत आहे. आम्हाला महाराष्ट्रात शांतता हवी आहे.

WEB TITLE- Editor Rashmi Thackeray write on BJP...


संबंधित बातम्या

Saam TV Live