बारावी बोर्ड परीक्षांबाबत आज शिक्षणमंत्र्यांची बैठक; आज अंतिम निर्णय होणार 

विहंग ठाकूर
मंगळवार, 1 जून 2021

मात्र काल न्यायालयाने केंद्र सरकारला दोन दिवसांत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक  Dr. Ramesh Pokhriyal Nishank आणि सर्व  राज्याचे शिक्षणमंत्री आणि  उच्च सचिव यांच्यासमवेत उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची CBSE आणि बारावी भारतीय माध्यमिक शिक्षणाचे प्रमाणपत्र  ICSEच्या इयत्ता 12 वी बोर्डाच्या परीक्षा  रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर Petition होणारी सुनावणी काल (31 मे)  तहकूब करण्यात आली.  यात पुढील सुनावणी 3 जून 2021 रोजी होणार आहे. (Education Minister meets today regarding 12th board exams; The final decision will be made today) 

मात्र काल न्यायालयाने केंद्र सरकारला दोन दिवसांत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक  Dr. Ramesh Pokhriyal Nishank आणि सर्व  राज्याचे शिक्षणमंत्री आणि  उच्च सचिव यांच्यासमवेत उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. आज सकाळी ही बैठक होणार आहे.  यात 12 बोर्डाच्या परीक्षांबबत चर्चा करण्यात येईल.. ज्यावर विचारविनिमय करून आज (1 जून) CBSE परिक्षांबाबत अंतिम निर्णय होणार आहे.  

जूनपासून SBI च्या कॅश काढण्याच्या नियमात नवे बदल 

- काय  आहे याचिका? 
सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे की सद्यस्थिती परीक्षा घेणे योग्य नाही, परंतु परीक्षा पुढे ढकलल्यास निकालास उशीर होईल. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासावर होईल. त्यामुळे परीक्षा रद्द करावी. विद्यार्थ्यांनी गुण देण्याचा मार्ग शोधला पाहिजे, जेणेकरून निकाल लवकरात लवकर जाहीर करता येईल.

- 31 मे रोजी झालेल्या सुनावणी वेळी काय झाले ? 
सीबीएसईची इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षा 2021 च्या परीक्षा रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सोमवारी 31 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी  भारतीय माध्यमिक शिक्षणाचे प्रमाणपत्र  ICSE आणि CBSE बोर्डाच्या परीक्षाबाबत दोन दिवसांत केंद्र सरकार निर्णय घेईल, असे  ऍटर्नी जनरल Attorney General  के.के. वेणुगोपाल यानी  सर्वोच्च न्यायालयात सांगितले.  त्याचबरोबर न्यायालयानेदेखील दोन दिवसांत केंद्र सरकारला अंतिम निर्णय घेण्याचे आदेश दिले.  त्यामुळे 3 जूनपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली. या सुनावणी दरम्यान,  केंद्राने दोन दिवसांची मुदत मागितली आहे.  

अ‍ॅडव्होकेट ममता शर्मा यांनी ही याचिका दाखल केली आहे.  तर  न्यायमूर्ती ए .एम. खानविलकर आणि दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. ''निर्णय घेण्यास तुम्ही मोकळे आहात. आपण वेळ घ्या,  परंतु मागील वर्षाच्या तुलनेत एखादा  वेगळा निर्णय घेणार  असल्यास त्यामागे  वाजवी कारण असावे. त्यामुळे लवकरात लवकर यावर्षासाठी निर्णय घ्या,  असे न्यायाधीशांनी म्हटले. त्यावर अॅटर्नी जनरल यांनी उत्तर दिले.  गेल्या वर्षी लॉकडाउनपूर्वी काही पेपर झाले होते. मात्र त्यावेळी परिस्थिती वेगळी होती.  यापूर्वी 28  मे रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने याचिकाकर्त्याला सीबीएसई आणि आयसीएसईच्या वकिलांना या याचिकेची प्रत सादर करण्यास सांगितले होते.   

Edited By - Anuradha Dhawade 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live