CBSE 10th Result 2021 : नवीन वेळापत्रकामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांनमध्ये निकालाची प्रतीक्षा वाढली

CBSE 10th Result 2021 : नवीन वेळापत्रकामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांनमध्ये निकालाची प्रतीक्षा वाढली
exam.

नवी दिल्ली : सीबीएसई CBSE दहावीचा निकाल आता आणखी लांबणीवर ढकलला गेला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने Central Board of Secondary Education नवीन शेड्यूल जारी केलेले आहे. सर्व सीबीएसई शाळेच्या संस्थापकांना आणि मुख्याध्यापकांना यात नोटीस जारी केली आहे. या नोटिस मध्ये सीबीएसई बोर्डाने नवीन शेड्युल Schedule जारी  करून दिले आहे. CBSE has made changes in the schedule for submission of marks of class 10th

याआधी माहिती होती कि, सीबीएसईचा दहावीचा निकाल जूनमध्ये June लावला जाणार.  पण आता हा निकाल त्याच्या पुढील महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये July सांगण्यात येणार आहे. यास कारण आहे कि, सीबीएसईने मार्क्स सबमिट करण्याच्या वेळापत्रकात बदल केले आहेत.

हे देखील पहा -

आलेल्या नव्या वेळापत्रक नुसार मार्क्स अपलोड करण्यासाठी पोर्टल उपलब्ध राहण्याची तारीख 20 मे 2021 आहे. या तारखेत काही बदल झालेला नाही. परंतु CBSE मार्क्स सबमिट करण्याची तारीख 30 जून 2021 आहे.  30 जून 2021 हि तारीख इंटरनल असेसमेंट मार्क्स सबमिट करण्याची आहे. त्यामुळे जूननंतर म्हणजेच जुलैमध्येच हे निकाल जारी केले जातील. CBSE has made changes in the schedule for submission of marks of class 10th

दहावी परीक्षांचा निकाल 20 जूनला जारी होणार असल्याचे याआधी सीबीएसई कडून सांगण्यात आले होते. त्यावेळी शाळांना बोर्डाकडे आपले मार्क्स सबमिट करण्याची तारीख 11 जून देण्यात आली होती. पण आता कोरोनाची भयानक परिस्थिती आणि बहुतेक राज्यांमधील लॉकडाऊन लावलेली वेळ पाहता ही तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्यामुळे हा निकालही लांबणीवर गेला आहे. मार्क्स सबमिशनची तारीख जूनच्या अखेरची सांगण्यात आली असल्याने निकाल जुलैमध्येच लागणार आहे. 

सीबीएसईच्या  दहावी बोर्ड परीक्षा  2021 साठी प्रत्येक विषयासाठी  त्यातील 20 गुण आंतरिक मूल्यांकन आणि  80 गुण वर्षभरात झालेल्या परीक्षांनुसार दिले जात आहेत. म्हणजेच जास्तीत जास्त 100 गुणांचे मूल्यांकन ठेवण्यात आलेले आहे. आतापर्यंत बहुतेक शाळांनी परीक्षांच्या गुणांची माहिती सीबीएसई पोर्टलवर अपलोड केलेली आहे. अशी माहिती आहे. 

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com