शंभर कोटींची उलाढाल आली वीस कोटींवर, शिक्षण पंढरीच्या अर्थकारणाला लागली घरघर

शंभर कोटींची उलाढाल आली वीस कोटींवर, शिक्षण पंढरीच्या अर्थकारणाला लागली घरघर
Laturs 100 crore education industry came down to 20 crores

लातूर: लातूर Latur हे शिक्षणाच्या बाबतीत राज्यातच नव्हे तर देशात नावाजलेल्या शहरांपैकी एक आहे. दरवर्षी या शिक्षण क्षेत्रात १०० कोटीत उलाढाल होत असते. पण कोरोनाच्या Corona काळातील लॉकडाऊनमुळे ही उलाढाल आता २० कोटींवर आली आहे. शिक्षणाचा दर्जा कायम राखण्यासाठी व टिकवण्यासाठी आता राज्याश्रयाची गरज भासत आहे. Laturs 100 crore education industry came down to 20 crores

लातूर नामांकित अस शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख आहे. राज्यातील मिनी कोटा म्हणून शहराकडे पाहिलं जातं. दरवर्षी किमान २५ हजार मुलं-मुली शिक्षणासाठी खाजगी क्लासेसमध्ये प्रवेश घेतात. यातून खाजगी शिकवण्यासाठी हॉटेल्स, हॉस्टेलस व अन्य अश्या क्षेत्रात उलाढाल होत किमान १०० कोटींचा व्यवहार होत असतो. 

यात हजारोंच्या संख्येने कामगारांना रोजगार मिळत असतो. पण गत दोन वर्षांच्या काळात कोरोनाचा कहर वाढला अन याच शिक्षण पंढरीला घरघर लागली आहे. आजमितीला किमान ७ हजार लोक बेरोजगार झाले आहेत. तर या खाजगी शिकवणी व्यवसायाची उलाढाल आता २० कोटी रुपयांवर आली आहे. लातूर पॅटर्न हे शिक्षणाची वेगळी पद्धत अशी ओळख देशात तयार करण्यात दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख Vilasrao Deshmukh व माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर Shivraj Patil Chakurkar याचं योगदान मोठे आहे.

हे देखील पहा - 

आता कोरोनाच्या संकटात, शैक्षणिक पंढरी अशी ओळख असलेलं लातूरला उभारी देण्यासाठी राजाश्रयाची गरज निर्माण झाली आहे, त्यामुळे लातूरच्या शिक्षणाच्या उभारणीसाठी पालकमंत्री अमित देशमुख Amit Deshmukh यांनी मदत करावी अशी आशा व्यक्त होत आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com