दहावी निकालाच्या मुद्द्यावर बैठकांचे सत्र; न्यायालयाच्या आदेशामुळे तारांबळ

दहावी निकालाच्या मुद्द्यावर बैठकांचे सत्र; न्यायालयाच्या आदेशामुळे तारांबळ
Series of Meetings held for Tenth Results

मुंबई  : दहावीचे Tenth Standard विद्यार्थी उत्तीर्ण करण्यासाठी त्याचे अंतर्गत मूल्यमापन आणि इतर कोणत्या प्रकारची तयारी करण्यात आली, याची माहिती न्यायालयापुढे Court सादर करावी लागणार असल्याने शालेय शिक्षण Education विभागाची मोठी तारांबळ उडाली आहे. त्यासाठी काल मुंबई Mumbai आणि पुण्यात Pune अधिकारी स्तरावर ऑनलाईन बैठका पार पडल्याचे सांगण्यात येते. Many Meetings held yesterday for Tenth Standard Results

हे देखिल पहा

दहावी परीक्षा रद्द करण्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने राज्य सरकारला परीक्षा रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, त्यासाठी अंतर्गत मूल्यमापन कशा प्रकारे केले जाणार आहे आदीची माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश दिले होते. 

त्यानुसार आज (ता. १९) शालेय शिक्षण विभागाकडून न्यायालयात माहिती सादर केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी स्तरावर चर्चा झाली. दुसरीकडे हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे सांगत शालेय शिक्षण विभागाकडून न्यायालयात आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी शिक्षण विभाग आपली बाजू न्यायालयात मांडणार असल्याचे अधिकारी सूत्रांकडून सांगण्यात आले. Many Meetings held yesterday for Tenth Standard Results

अहवाल तयार
दिवसभरात माध्यमिक शिक्षण संचालक, प्रधान सचिव आणि राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष यांच्यात मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात येणाऱ्या माहितीवर चर्चा झाली. त्याचा गोपनीय अहवाल तयार करण्यात आला असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चस्तरीय अधिकारी सूत्रांकडून देण्यात आली.
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com