नौदलात 2700 ‘सेलर’ पदांसाठी भरती

 नौदलात 2700 ‘सेलर’ पदांसाठी भरती
2700 vacancies in navy for post of saler

नवी दिल्ली: भारतीय नौदलात कार्यालयीन कामकाज करण्याची संधी उपलब्ध झालीय. जवानांना विविध वस्तू पुरवण्यासह इतर कार्यालयीन कामकाजाच्या २७०० रिक्त पदांची भरतीप्रक्रिया सुरू झालीय.. बारावी उत्तीर्ण उमेदवारांना ही संधी असून त्यांची 'सेलर' या पदावर नियुक्ती केली जाईल. यासाठी इच्छुकांना १८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार असल्याचे नौदलाने सांगितले आहे. ऑगस्ट २०२० मध्ये नवीन भरती होणार आहे. या अंतर्गत आर्टिफिशिअल अॅप्रेंटिस विभागात ५००, तर वरिष्ठ माध्यमिक भरती विभागात २ हजार २०० पदे भरण्यात येतील.

काय असतील पदासाठी आवश्यक बाबी?

1. दोन विभागांतील पदांकरिता गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसहित ६० टक्के गुणांनी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

2. आर्टिफिशिअल अॅप्रेंटिस विभागात २०, तर वरिष्ठ माध्यमिक भरती विभागात १५ वर्षांची नियुक्ती असेल. लेखी परीक्षेनंतर होणारी मेडिकल ओडिशातील चिल्का येथे होईल.  नियुक्ती संपूर्ण भारतातील कार्यालयांमध्ये दिली जाणार आहे.

3. अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार असून १४ हजार ६०० रुपये वेतन असेल. वेतनासहित इतर भत्ते आणि पदोन्नतीसंदर्भातील अटी व नियम नौदलातर्फे अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहेत. 

इच्छुकांनी https://www.joinindiannavy.gov.in/ या वेबसाइटवर अर्ज नोंदणी करावी. मात्र फक्त नौदलाच्या वेबसाइटवरील अधिकृत माहिती ग्राह्य धरावी. तसेच काही गैरप्रकार अथ‌वा अडचणी संभावल्यास नौदलाकडे संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलंय.

परिक्षेचं स्वरुप

सेलर पदाच्या भरतीअंतर्गत ऑनलाइन परीक्षा फेब्रुवारी २०२० मध्ये होणार आहे. त्यासंदर्भातील अपडेट्स उमेदवारांना ई-मेल आणि वेबसाइटद्वारे कळविण्यात येतील. परीक्षेनंतर उमेदवारांची शारीरिक चाचणी होईल. १.६ किलोमीटर अंतर ७ मिनिटांत धावत पूर्ण करणे, २० ते ३० बैठका आणि १० पुशअप्स या चाचणीत उमेदवारांना पूर्ण करावे लागतील. ऑनलाइन परीक्षा आणि शारीरिक चाचणीच्या गुणवत्ता यादीनंतर वैद्यकीय तपासणी होईल. त्यानंतर नियुक्तीची स्वतंत्र यादी जाहीर होईल, असे नौदलाने सांगितले.

Web Title - 2700 vacancies in navy for post of saler 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com