नाशिकसह पुणे जिल्ह्यात लवकरच कॅम्पस निवडणूक 

नाशिकसह पुणे जिल्ह्यात लवकरच कॅम्पस निवडणूक 

नाशिकसह नगर आणि पुणे जिल्ह्यात पुणे विद्यापीठास कॅम्पस निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे. कारण नवीन सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार कॅम्पसमधील खुल्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करावा, अशी सूचना या निवडणुकांच्या राज्यस्तरीय समन्वय समितीने विद्यापीठांना दिली आहे. 

या निवडणुकांची प्रक्रिया ३१ जुलैपूर्वीच जाहीर करणे अपेक्षित आहे. मात्र, सध्या अनेक महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्नित असल्याची तांत्रिक अडचण शिक्षणसंस्थांच्या वतीने उपस्थित करण्यात आली होती.  आता ऑगस्टमध्ये निवडणूक कार्यक्रम निश्चित करून ३० सप्टेंबरपर्यंत विद्यार्थी परिषदांच्या स्थापनांची नवीन 'डेडलाइन' देण्यात आली आहे. 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com