छपाक सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर पाहिलात?

छपाक सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर पाहिलात?

मुंबई : ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित छपाक या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झालाय. अभिनेत्री दीपिका पदुकोणनं चित्रपटात लक्ष्मी अगरवालची भूमिका साकारली आहे. छपाकमध्ये दीपिकाच्या पात्राचं नाव मालती आहे. तिच्यासोबत अभिनेता विक्रांत मैसी महत्त्वाच्या भूमिकेत आहे. विक्रांतक्या पात्राचं नाव अमोल आहे. रणवीर सिंगसोहत विवाहबद्ध झालेल्या दीपिकाचा लग्नानंतरचा हा पहिलाच चित्रपट आहे. 

दीपिका पादुकोण छपाक चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे. या चित्रपटात ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवाल हिच्या संघर्षाची आणि खडतर प्रवासाची कथा या सिनेमात आहे. यात लक्ष्मीच्या भूमिकेत दीपिका पादुकोण दिसणार आहे. तर विक्रांत लक्ष्मीचा लिव्ह इन पार्टनर आलोक दीक्षितच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.

छपाक चित्रपटाच्या फर्स्ट लूकपासून या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जास्त उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलर खूप चांगला आहे. यात दीपिकाने दमदार अभिनय केलाय. दीपिकाने या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतलेली दिसून येते.

या चित्रपटात लक्ष्मी अग्रवालचा खडतर प्रवास रुपेरी पडद्यावर अनुभवणे कमालीचे ठरणार आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित छपाक चित्रपट 10, जानेवारी, 2020मध्ये प्रदर्शित होणार आहे.

ताज्या अपडेट्स आणि बातम्यांच्या सविस्तर विश्लेषणासाठी पाहात राहा...
साम टीव्ही न्यूज ||LIVE||

LINK :: https://bit.ly/384UeFJ

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

Web Title - chhapak movie trailer realise 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com