Breaking दहावीची परिक्षा नाहीच; मुल्यमापनाची नवी पद्धती जाहीर 

Breaking दहावीची परिक्षा नाहीच; मुल्यमापनाची नवी पद्धती जाहीर 
Exam

मुंबई : यंदा कोरोनाची स्थिती लक्षात घेता दहावीची परिक्षा न घेण्याचा अंतीम निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. १० वीच्या विद्यार्थ्यांना मुल्यमापन करुन उत्तीर्ण केलं जाणार आहे. त्यासाठीची रचना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केली. अकरावी परिक्षेसाठी वैकल्पीक परिक्षा घेण्यात येणार आहे. Tenth Standard Exam will not be held in Maharashtra

हे देखिल पहा

महाराष्ट्र राज्यसरकार आज (२८ मे ) १० वीच्या परीक्षा न घेण्यासंदर्भात  उच्च न्यायालयात  प्रतिज्ञापत्र  सादर करणार आहे. परीक्षासंदर्भातील निकष ठरवण्यात आले असून आज जाहीर केले गेले. आज दुपारी याबाबतचा जीआर निघणार आहे. 
पालक व विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचे. जून अखेर दहावीचा निकाल लावायचा आहे. 

त्यामुळे कोविड १९ च्या तिसऱ्या लाटेत तज्ञांनी  लहान मुलांना संक्रमणाचा सर्वाधिक धोका सांगितला आहे.  त्यामुळे सद्यस्थिती परीक्षा घेण्यासाठी  योग्य नाही.  परंतु परीक्षा पुढे ढकलल्यास निकालास उशीर होईल आणि याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासावर  होऊ शकतो. त्यामुळे आता राज्य शासनानं त्याबाबतची गुण रचना तयार केली आहे. Tenth Standard Exam will not be held in Maharashtra

ही रचना अशी असेल
विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० टक्के मुल्यमापन होणार
लेखीसाठी ३० पैकी गुण देणार
गृहपाठ, प्रात्यक्षिक व तोंडी परिक्षेसाठी - २० पैकी गुण
नववीच्या निकालावर आधारित - ५० पैकी गुण
अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक सीईटी घेणार
दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित सीईटी असेल
सीबीएसई आयसीएसईलाही सीईटी लागू होणार
श्रेणीसुधारासाठी विद्यार्थ्यांना संधी
परिस्थिती सामान्य झाल्यावर दोन परिक्षांना बसण्याची संधी
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com