‘तोक्ते’ चक्रीवादळाचा प्रभाव दिसू लागला.... ( पहा व्हिडिओ )

Saam Banner Template
Saam Banner Template

केरळपासून सुरू झालेले तोक्ते चक्रीवादळाचे cyclone परिणाम सिंधुदुर्गाच्या Sindhudurg किनारपट्टीला जाणवू लागले आहेत. समुद्रामध्ये मोठे मोठ्या लाटा उसळताना पाहायला मिळत आहेत. स्थानिक प्रशासनाने समुद्रामध्ये मच्छिमारीना Fishing न जाण्याचं आवाहन जिल्हाधिकारी Collector यांनी मच्छीमार बांधवांना केले आहे. तसेच देवगड Devgad बंदरांमध्ये केरळ तामिळनाडू गुजरात Gujrat या भागांमधून देवगड पंधरा मध्ये आश्रयाला नका दाखल झाले आहेत. आज संध्याकाळी साडेपाच नंतर समुद्राला Sea मोठ्या प्रमाणात उधानाला सुरुवात झाली. हे उधाण उद्या संध्याकाळपर्यंत असण्याची शक्यता हवामान खात्याने कोकण किनारपट्टीला वर्तवली आहे. effect of cyclone in different region

तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील मच्छिमार बांधव सतर्क राहिले आहेत. याचं कारण म्हणजे दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारची चक्रीवादळ या कोकण किनारपट्टी धडकत असतात आणि त्याचा फटका स्थानिक पारंपरिक मच्छीमारांना फार मोठा बसत असतो. गेले अनेक वर्षांपासून येणाऱ्या चक्रीवादळाचा वाईट अनुभव आलेले आहे. काही वेळा मोठ्या प्रमाणात नुकसान होत पण ते सुद्धा नुकसान भरपाई शासन वेळेवर देत नाही मागील नुकसान भरपाई काही जणांना मिळली तर काही जणांचा अजून पत्ताच नाही अशी परिस्थिती आहे.  या नव्याने आलेल्या चक्रीवादळाच फटका मालवण, वेंगुला, देवगड,विजयदुर्ग या किनारपट्टीला सुद्धा बसणार असण्याची शक्यता मच्छिमार बांधवांनी व्यक्त केली आहे.

अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे  तोक्ते चक्रीवादळाची निर्मिती झालेली आहे त्यामुळं कोकण किनारपट्टीला या चक्रीवादळाचा प्रभाव हळूहळू जाणवू लागलेला आहे. त्याची तीव्रता आता रायगड,सिंधुदुर्ग, रत्नागिरी नंतर पालघर किनारपट्टीला जाणवू लागली आहे. संध्याकाळनंतर या चक्रीवादळाची तीव्रता अधिक होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर समुद्र किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. दोन दिवस या चक्रीवादळाचा प्रभाव किनारपट्टीला असणार आहे. हे वादळ आता कोकण किनारपट्टी भागातून पुढे गुजरातच्या दिशेने जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.  effect of cyclone in different region

तर गोव्यात तोक्ते चक्रीवादळाच्या परिणामाला सुरुवात झाली समुद्र खवळलेला आहे. याशिवाय समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढला असून काही ठिकाणी समुद्राचं पाणी सकल भागात घुसण्याची सुरुवात झाली आहे. समुद्राच्या लाटानी रुद्र रूप धारण केले असून लाटांची उंचीही वाढली आहे. येत्या चोवीस तासात मुसळधार पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने व्यक्त केली असून समुद्र किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या सर्वांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. मच्छिमारांना समुद्रात मासेमारी करण्यासाठी कॅप्टन ऑफ पोर्ट्सने बंदी घातली असून 18 मे पर्यंत ही बंदी असणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com