अयोध्येचा कायापालट; युनेस्कोच्या जागतिक वारसा शहरांमध्ये समावेशासाठी प्रयत्न

Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandir

प्रभू श्रीरामचंद्रांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येनं (Ayodhya) आता कात टाकायला सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) ऐतिहासिक निवाड्यानंतर मंदिराच्या Ayodhya Ram Mandir उभारणीचे स्वप्न सत्यामध्ये उतरताना दिसते आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ Yogi Adityanath यांनी या शहराचा कायापालट घडवून आणण्याचा संकल्प केला आहे.  Efforts for inclusion Ayodhya into UNESCO World Heritage Site

नव्या विकास आराखड्यानुसार अयोध्या शहराचा विकास तर होईलच; पण त्याचबरोबर अयोध्येला लागून असलेल्या सगळ्या परिसराचे रूपांतर धार्मिक पर्यटन केंद्रामध्ये केले जाणार आहे. त्यासाठी पंधरा ते वीस हजार कोटी रुपयांचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात येईल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून रिंग रोड उभारला जाणार असून त्यावर २ हजार ५८८ कोटी खर्च केले जाणार आहेत. अन्य मार्गांच्या उभारणीवर एक हजार ३३८ कोटी रुपये खर्च करण्यात येतील. ही सगळी कामे राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्ण करेल.

स्थानिक पातळीवर पुलांच्या उभारणीसाठी ५४२ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून दोन हजार कोटी रुपयांचा गृहनिर्माण प्रकल्प देखील प्रस्तावित आहे. येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीचे विस्तारीकरण केले जाणार असून, त्यासाठी केंद्राकडे १ हजार २५० कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली आहे.

अयोध्येसाठीच्या रेल्वे सेवेमध्ये सुधारणा करण्यासाठी सहा कोटी रुपयांचा आराखडा तयार केला जात आहे. जल आणि स्वच्छतेला राज्य सरकारचे प्राधान्य असून यासाठी ५३२ कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. याशिवाय काही सिंचन योजनांसाठी दोन हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. याचा फायदा अयोध्येला लागून असणाऱ्या भागालाही होईल. अयोध्येला आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र (Tourist center) बनविण्याचे योगींचे स्वप्न आहे. हे नगर वैश्‍विक आध्यात्मिक केंद्र बनू शकते, असे योगींचे म्हणणे आहे. Efforts for inclusion Ayodhya into UNESCO World Heritage Site

पायाभूत सुविधांच्या विकासावर राज्य सरकारचा UP Government विशेष भर दिसून येतो. येथील विमानतळाची छोटी धावपट्टी ही आणखी विस्तीर्ण करण्यात आली असून येथे रामाच्या नावाने आंतरराष्ट्रीय विमानतळ Airport उभारण्यात येईल. येथील छोटे रेल्वे स्थानक हे आणखी मोठे झाले असून त्याच्या आधुनिकीकरणावर ४४७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. देशातील शंभर आघाडीच्या रेल्वे स्थानकांमध्ये आता अयोध्येतील रेल्वे Raiway स्थानकाचा समावेश असेल. या रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्येच तीन हजार प्रवाशांना राहता येईल एवढी महाकाय निवासव्यवस्था उभारण्यात येईल.

याच ठिकाणी बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी भजन संध्या स्थळ उभारले जाईल. येथील बस स्थानकाहि स्वच्छ आणि विस्तीर्ण होणार आहे. अत्याधुनिक सोयींनी युक्त असे बसस्थानक येथे उभारले जाणार असून त्यामुळे कोणत्याही वेळी येथे तीन हजार गाड्या उभ्या राहू शकतील. रेल्वे नेटवर्कच्या माध्यमातून अयोध्येला राज्यातील अन्य बड्या शहरांसोबत जोडण्याचे आश्‍वासन रेल्वे मंत्रालयाने यूपी सरकारला दिले आहे. राज्याने मात्र आधीच एक पाऊल पुढे टाकताना ही कनेक्टिव्हिटी अधिक बळकट केली आहे.

अयोध्येच्या या विकास आराखड्यामध्ये ‘थीम पार्क’चा (Theme park) देखील समावेश आहे. शहराचे महापौर ह्रषीकेश उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार शंभर एकरवर हे पार्क उभारले जाणार असून रामायणकालीन त्रेतायुग त्यातून साकारले जाणार आहे. यामध्ये राजा दशरथाची अयोध्या आणि रावणाची Rawana लंका पाहायला मिळेल. यामध्ये ज्या अशोक वाटिकेमध्ये सीतेला Sita ठेवण्यात आले होते. ती जागा देखील ठळकपणे दर्शविण्यात येईल. Efforts for inclusion Ayodhya into UNESCO World Heritage Site

या थीम पार्कची दोन टोके पुलाच्या माध्यमातून जोडण्यात येईल. त्याला रामसेतू असे नाव देण्यात येईल. या पार्कमध्ये शबरी पार्कचाही समावेश असून येथे बोराची झाडेही पाहायला मिळतील. या पार्कच्या शेजारीच मोठे संग्रहालय तयार केले जाणार असून त्यामध्ये समग्र रामायण पाहायला मिळेल. रामायणकालीन चित्रे ही या संग्रहालयाचे वैशिष्ट्य असतील. ताज्या विस्ताराबाबत जिल्हाधिकारी अनुज झा म्हणाले की, ‘‘ याआधी अयोध्येचा मध्यवर्ती भाग असलेला ३१ किलोमीटरपर्यंतचा मुख्य परिसर विकसित करण्याचे नियोजन होते, पुढे त्याची व्याप्ती ८७३ किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आली. मोठ्या विकास आराखड्यामध्ये आता त्याचा समावेश करण्यात आले आहे.’’

या आराखड्यामध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आल्याचे दिसते. विविध सरकारी विभागांच्या मदतीने आराखडा साकारण्यात आला आहे. यामध्ये गृहनिर्माण, नगरविकास, विद्युत, रस्ते यांच्याशिवाय पाणी आणि स्वच्छता विभागांचाही समावेश आहे. अयोध्येला इंटरनॅशनल (International) टच देण्यासाठी राज्य सरकार जगातील आघाडीच्या कंपन्यांच्या संपर्कात होते.

यात जगातील आठ कंपन्यांच्या नावांवर चर्चा करण्यात आली. शेवटी राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने कॅनडाच्या ‘लिया असोसिएट्स’ या नावावर शिक्कामोर्तब केले. या कंपनीची सी.के.कुकरेजा आर्किटेक्टस तसेच लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांसोबत भागीदारी आहे. या कंपन्यांकडेच अयोध्येचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. Efforts for inclusion Ayodhya into UNESCO World Heritage Site

कंपन्यांचा हाच गट आता शहर विकास, वाहतूक, पायाभूत सेवा, वारसा स्थळांचा विकास, पर्यटन, नगरविकास आणि अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांचा वापर याबद्दल ब्लूप्रिंट तयार करण्याचे काम करतो आहे. सरकारी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, जगातील शंभर आणि आशियातील पाच आघाडीच्या वास्तू रचनाकारांमध्ये कुकरेजा यांचा समावेश होतो.

देश- विदेशातील अधिकाधिक पर्यटकांना राज्यात आकर्षित करण्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा भर असून अयोध्येला जगातील आघाडीचे पर्यटनस्थळ बनविण्याचा त्यांचा निर्धार आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा शहरांमध्ये अयोध्येचा समावेश व्हावा म्हणून देखील यूपी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मोक्षनगरी म्हणून अयोध्येचा विकास करण्याचा योगी आदित्यनाथ यांचा संकल्प आहे.

आतापर्यंत हा मान केवळ वाराणसीला Varanasi मिळत होता. शरयू नदीच्या Sharayu River काठावर असलेल्या सर्व घाटांची नावेही बदलली जाणार आहेत. अयोध्येतील मुख्य मंदिराच्या आराखड्यामध्येही काही सुधारणा करण्यात आल्या असून वेळोवेळी तज्ज्ञांनी केलेल्या सूचनांचा यासाठी विचार करण्यात आला आहे. या आधी मंदिराचे डिझाईन हे सोमपुरा कुटुंबीयांतील वास्तूविशारदांच्या हातून करण्यात आले होते. आता या मंदिराचा आकार आणखी वाढविण्यात आला आहे. या मंदिराच्या वास्तूखाली पाणी आढळून आल्याने मुख्य वास्तूच्या रचनेमध्ये काही रचनात्मक बदल केले जाणार असून यासाठी अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे विचारात घेण्यात आले आहे.

शेजारील शरयू नदीच्या पात्रातीलच पाणी या ठिकाणी आल्याचे उघड झाल्याने या मंदिराची संपूर्ण संरचनाच बदलावी लागणार आहे. मंदिर समितीच्या प्रवक्त्याने सांगितले की, आयआयटी चेन्नई (Chennai) आणि सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूटने एक वेगळ्या प्रकारचा पाया तयार केला आहे. Efforts for inclusion Ayodhya into UNESCO World Heritage Site

ज्यामध्ये पोलादाचा वापर केला जाणार नाही. हे मंदिर अनेक शतके टिकणार असल्याने पोलाद गंजण्याचा धोका असतो. या प्रस्तावित मंदिराच्या जागी आधीच ४० फूट खोल खड्डा खोदण्यात आला आहे. यामध्ये विशेष मिश्रणांनी युक्त सिमेंट, खडी, वाळू आणि काही रसायने यांचे थर भरले जाणार आहेत, जेणेकरून हा पाया आणखी मजबूत होईल आणि त्यावर हे मंदिर उभारण्यात येईल. या मंदिराच्या उभारणीसाठी मागील अनेक वर्षांपासून कारसेवकपुरममध्ये ठेवण्यात आलेल्या कोरीव दगडांचा वापर केला जाणार आहे. Efforts for inclusion Ayodhya into UNESCO World Heritage Site

Edited by- Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com