VIDEO | शेतात उघड्या जागेवर अंड्यांची शेती ?

अभिजीत सोनावणे साम टीव्ही नाशिक
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

 

व्हिडीओत उघड्या जागेवर कोंबडी अंडी देत असल्याचं दाखवण्यात आलंय...या प्रकाराला अंड्यांची शेती म्हणतात...पण, अशा प्रकारे अंड्यांची शेती करणं शक्य आहे का...? असं असेल तर अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकेल...त्यामुळं या अंड्यांच्या शेतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला...

 

व्हिडीओत उघड्या जागेवर कोंबडी अंडी देत असल्याचं दाखवण्यात आलंय...या प्रकाराला अंड्यांची शेती म्हणतात...पण, अशा प्रकारे अंड्यांची शेती करणं शक्य आहे का...? असं असेल तर अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकेल...त्यामुळं या अंड्यांच्या शेतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला...

या व्हिडीओ बघा...उघड्या जागेवर कोंबड्या फिरत असल्याचं दिसतंय...तर या जागेत कुठेही कोंबड्या अंडी देतायत...अशा प्रकारे कोंबड्या अंडी उघड्यावर देतात का...? झाडावर बनवलेल्या ठिकाणी कोंबड्या अंडी देतात का...? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी पोल्ट्री फार्मिंग एक्सपर्टला भेटले...त्यांना हा व्हिडीओ दाखवला आणि खरंच व्हिडीओत दाखवलंय ते कितपत खरं आहे...? याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली...

जमिनीवर जशी अंडी पडल्याचं दाखवलंय, तसे कोंबड्या कधीही अंडी देत नसल्याचा दावा एक्सपर्टने केलाय...पण, अशी शेती आपल्याकडे करणं शक्य आहे का...? याबद्दलही अधिक माहिती जाणून घेतली...

त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा...

 

अंड्यांची शेतीतील व्हिडीओमध्ये पूर्णतः तथ्य नाही, काही बाबी अतिरंजित आणि खोट्या आहेत

याला फ्री रेंज फार्मिंग म्हणतात, जगभरात अशी शेती केली जाते

हा व्हिडिओ फॅब्रिकेट आहे, या व्हिडिओतील 70 ते 80 टक्के बाबी तथ्यहीन आणि खोट्या आहेत

कोंबड्या कधीही उघड्यावर अंडी देत नाहीत, अंडी देण्यासाठी कोंबड्यांना प्रायव्हसी हवी असते

कोंबडी खुराड्यात, एखाद्या कोपऱ्यात, झाडीमध्ये अंडी देते

पाठीवरील बास्केटमध्ये अंडी गोळा केली जाते, तशी अंडी कधीही गोळा केली जात नाहीत...कारण अंडी एकावर एक ठेवली तर ती फुटतात असं एक्सपर्ट सांगतात...कोंबड्यांना एखाद्या पसरट भांड्यात अन्न आणि पाण्याची व्यवस्था केली जाते...त्यामुळे व्हिडिओत अंड्याची शेती केली जात असल्याचा दावा सत्य असला, तरी त्यात दाखवण्यात आल्याप्रमाणे अंड्यांची शेती होत नाही...

 


संबंधित बातम्या

Saam TV Live