अंडी 100 रुपये डजन होणार? अंड्यांचा काळाबाजार तर सुरु झाला नाही? वाचा काय घडलंय...

साम टीव्ही
बुधवार, 23 सप्टेंबर 2020
 • अंडी 100 रुपये डजन होणार?
 • 3 दिवसांत शेकडा 30 रुपयांनी वाढ
 • अंड्यांचा काळाबाजार तर सुरु झाला नाही? 

कोरोनाकाळात इम्युनिटी वाढवण्यासाठी लोक अंड्यांचा समावेश डाएटमध्ये करु लागले. आणि एकाएकी अंड्यांचा पुरवाठा कमी झाला. त्यामुळे अंड्याचे भावही भरमसाठ वाढलेत. नेमकी का होतेय ही वाढ? काय आहे या मागचं कारण? अंड्यांचा काळाबाजार तर सुरु झालेला नाही ना? वाचा

सोमवारी  शेकडा ५४० रूपये असणारी अंडी बुधवारी ५७० रूपयांवर पोहोचली. म्हणजेच अवघ्या ३ दिवसांत अंड्यांच्या किमतीत थेट 30 रुपयांची वाढ झाली. दरवाढीचा हा वेग असाच सुरु राहिला तर महिन्याभरात अंडी 100 रुपये डझन होतील की काय? अशी भीती वाटू लागलेय.

राज्यभरात अंड्यांचा पुरवाठा कमी झालाय. नेमकी राज्यातली स्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी अंडी विक्रेत्यांकडे पोहोचले.

मुंबई.

 • मुंबईत दिवसाला 85 लाख ते 1 कोटी अंड्यांची मागणी असते
 • मात्र सध्या केवळ 40 ते 45 लाख अंड्यांचाच पुरवठा होतो...
 • तर तिकडे कोरोना हॉटस्पॉट ठरणाऱ्या पुण्यातही काही वेगळी स्थिती नाहीये. 
 • पुणे जिल्ह्याला दररोज 35 ते 40 लाख अंड्याची मागणी आहे
 • मात्र सध्या केवळ 25 लाख अंड्याचाच पुरवठा होतोय. 
 • तर नागपुरातही अंड्यांचा तुटवडा आहे. नागपूर जिल्ह्यात दररोज 20 लाख अंडी लागतात. मात्र सध्या 4 लाख अंड्यांचा तुटवडा आहे.
 • नाशिक शहरात दररोज 9 ते 10 लाख अंड्यांची मागणी असते. मात्र सध्या पुरवठा फक्त 6 ते 7 लाख अंड्यांचा होतोय.
 • तर औरंगाबादेत दिवसाला किमान १० लाख अंड्यांची मागणी असते. पण सध्या केवळ ४ लाख अंड्यांचा पुरवठा होतोय.
 • आधीच राज्यात अंड्यांचा तुटवडा आहे.  त्यात पोल्ट्री व्यावसायिक आणखी एका रुपयांची दरवाढ मागतायत.


संबंधित बातम्या

Saam TV Live