दोन कोरोनाग्रस्त होते अजित पवारांच्या व्यासपीठावर?

भारत नागणे
शनिवार, 10 एप्रिल 2021

मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या प्रचार सभेला उपस्थित असलेले आठ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह  असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गेले दोन दिवस अजित पवार पंढरपूर पोटनिवडणुकीचा प्रचार करत आहेत. त्यांच्या विविध ठिकाणी सभा होत असून सभेला मोठी गर्दी होत आहे. 

पंढरपूर : मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या प्रचार सभेला उपस्थित असलेले आठ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गेले दोन दिवस अजित पवार पंढरपूर मंगळवेढा Pandharpur Mangallwedha पोटनिवडणुकीचा प्रचार करत आहेत. त्यांच्या विविध ठिकाणी सभा होत असून सभेला मोठी गर्दी होत आहे. Eight Found Corona Positive Who Attended Ajit Pawar Rally

दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपूर विधानसभा पोट निवडणूकीच्या निमित्ताने प्रचार सभा घेत आहेत. सभेला मोठी गर्दी ही होत आहे. परवा सकाळी मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथे सभा झाली. सभेनंतर येथील आठ जणाना त्रास सुरू झाला. त्यांची तपासणी केल्यानंतर ते कोरोना Corona पाॅझीटीव्ह असल्याचे आढळून आले. यापैकी दोन जण अजित पवारांच्या व्यासपीठावर असल्याचीही चर्चा आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार  यांची परवा पंढरपुरात सभा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस NCP पक्षाचा उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. आणि या सभेसाठी अपेक्षेपेक्षा जास्त प्रचंड प्रमाणात लोकांनी गर्दी जमवली होती. या प्रकरणामुळे सभेचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. Eight Found Corona Positive Who Attended Ajit Pawar Rally

पंढरपूर-मंगळवेढा (Pandharpur Mangalwedha) विधानसभा पोटनिवडणुकी (Bi- election) रणधुमाळीत आता कोणाचा विजय होते याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पंढरपूर तालुक्यातील गादेगाव  मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी घेतलेले भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी काल (ता.8 एप्रिल) ला अजित पवार यांनी सभा घेतली. यावेळी पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोबतच पंढरपुरात अजित पवारांच्या उपस्थितीत भाजप (BJP) नेते कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) यांनी राष्ट्रवादीत पक्षात प्रवेश केला.

या कार्यक्रमाला फक्त 200 लोकांची परवानगी होती. मात्र प्रचंड प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग लांब लांब पर्यंत दिसून येत नव्हते. यातील अनेक जण तर मास्क न घालताच सभेला आले असल्याचे दिसत होते. यावेळी कोरोना निर्बंधांना धुळीस मिळवण्यात आले.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live