हैदराबादच्या उद्यानातील आठ सिंहांना कोरोना

वृत्तसंस्था
बुधवार, 5 मे 2021

देशभरात कोरोनाचा उद्रेकाने जनता हैराण झाली असताना आता जनावरांमध्येही कोरोनाची लक्षणे दिसू लागली आहेत. येथील नेहरू झुलॉजिकल पार्क (एनझेडपी) मधील आठ आशियायी सिंहांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत.

हैदराबाद :  देशभरात कोरोनाचा उद्रेकाने जनता हैराण झाली असताना आता जनावरांमध्येही कोरोनाची लक्षणे दिसू लागली आहेत. येथील Hyderabad नेहरू झुलॉजिकल पार्क (एनझेडपी) NZP मधील आठ आशियायी सिंहांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. Eight Lions in Hyderabad Park Suffered from Corona

उद्यानातील आठ सिंहांना Lions श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. तसेच भूक कमी होणे, नाकातून पाणी येणे आणि खोकला येणे आदी लक्षणेही पशुतज्ज्ञांना आढळली. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमांनुसार १२ सिंहाच्या नाक आणि तोंडातील स्त्रावांचे नमुने ‘सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलेक्युलर बायोलॉजी’ (सीसीएमबी) कडे तपासणीसाठी दिले होते. ‘आरटी-पीसीआर’ चाचणीत हे सर्व सिंह पॉझिटिव्ह आढळले असल्याची माहिती ‘सीसीएमबी’ने २९ एप्रिल रोजी उद्यानाच्या अधिकाऱ्यांना दिली. 

सिंहांच्या स्त्रावांच्या नमुन्यातून कोरोनाच्या विषाणूचे विश्‍लेषण केले असून तो फारसा धोकादायक नसल्याचे सांगण्यात आले आहे. या सिंहांचे विलगीकरण केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उपचारांना सिंह प्रतिसाद देत असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे या प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. एस. कुकरेटी यांनी सांगितले.Eight Lions in Hyderabad Park Suffered from Corona

उद्यानांमध्ये कडक सुरक्षा नियम पाळावेत
कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून अनेक प्राणी संग्रहालये आणि पशुपालन केंद्रातील प्राण्यांना मानवाकडून संसर्ग झाल्याच्या तक्रारी येत आहेत. प्राण्यांमधील संसर्ग रोखण्यासाठी सध्याच्या काळात देशातील उद्यानांनी सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे. प्राण्यांची स्वाब चाचणी घेणे अत्यंत कठीण असल्याने त्यांच्यात दिसणाऱ्या कोरोनाच्या लक्षणांवर बारकाईने लक्ष आवश्‍यक आहे, अशा सूचना ‘सीसीएमबी’चे मुख्य शास्त्रज्ञ कार्तिकेयन वासुदेवन यांनी केल्या.


संबंधित बातम्या

Saam TV Live