VIDEO | छोटा राजनच्या सांगण्यावरुन लागली होती दाऊदच्या हत्येची फिल्डिंग

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

लकडावाला जवळपास २० वर्षे सातत्याने आपली ठिकाणे बदलत वेगवेगळ्या ठिकाणी पळत होता. त्यादरम्यान डी कंपनीपासून ते छोटा राजन अशा गॅंगसाठी काम करून त्याने स्वतः खंडणीवसुलीचे रॅकेट सुरू केले. गेल्या वर्षी लकडावालाची मुलगी शिफा हिच्या खोट्या पासपोर्ट प्रकरणातील अटकेनंतर लकडावाला मुंबई पोलिसांच्या सापळ्यात अडकला

 

मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या सांगण्यावरुन त्याचा हस्तक विकी मल्होत्राने, लकडवालासह दहा जणांना साथीला घेत पाकिस्तानातील कराचीच्या दर्ग्याबाहेर दाऊद इब्राहीमच्या खात्म्यासाठी फिल्डींग लावली होती. मात्र ऐनवेळी याची माहिती दाऊदला मिळाल्याने, त्याचा हा कट फसल्याचा धक्कादायक खुलासा एजाज लकडावालने चौकशीत केला आहे.

दाऊद छोटा राजन यांच्यात वितुष्ट आल्याने, या दोघांमध्ये गॅंगवॉर सुरु झाला. नेमके यादरम्यान, राजनने 1998 साली दाऊदचा खात्मा करण्याचा घातकी कट आखला. या कटाचे नेतृत्व राजनचा खास हस्तक विक्की मल्होत्रा अणि फरिद तनाशाकडे होते. या दोघांनी त्यांची टीम तयार केली होती. काही दिवस बॅंकॉक, दिल्ली, उत्तर प्रदेशात दाऊदला मारण्याची रंगीत तालीम केल्यानंतर हे पथक कराचीला दाखल झाले होते. 

या कटात बाळु डोकरे, विनोद मटकर, संजय घाटे, बाबा रेड्डी आणि एजाज लकडावाला यांचा समावेश असल्याचे एजाजने त्याच्या चौकशीत सांगितले. नेमके यादरम्यान दाऊदची मुलगी मारीया हिचा मृत्यू झाला होता. यामुळे मुलीच्या मृत्यूनंतर काही धार्मिक विधी करण्यासाठी दाऊद दर्ग्यात येणार असल्याची माहिती विक्कीला मिळाली होती. म्हणूनच विकीच्या नेतृत्त्वातील टीम दर्ग्या बाहेरच अनेक दिवस तळ ठोकून होती.

मात्र दाऊदला मदत करणाऱ्या नेपाळचे खासदार मिर्झा दिलशाद यांनी डी कंपनीला या सगळ्या कटाबाबतची टीप शेवटच्या क्षणी दिली. त्यामुळे दाऊद या हल्ल्यातून बचावला. तसेच विक्कीसह त्याच्या हस्तकांचा शोध पकिस्तानात घेण्यास सुरुवात झाल्याने, या सर्वानी नेपाळमध्ये आश्रया घेतला. तर त्याचदरम्यान, संतापलेल्या छोटा राजनने त्याच वर्षी बेग याच्याही हत्येचा कट रचल्याची माहिती लकडावालाने मुंबई पोलिसांनी दिली.

 

 

 

 

लकडावाला जवळपास २० वर्षे सातत्याने आपली ठिकाणे बदलत वेगवेगळ्या ठिकाणी पळत होता. त्यादरम्यान डी कंपनीपासून ते छोटा राजन अशा गॅंगसाठी काम करून त्याने स्वतः खंडणीवसुलीचे रॅकेट सुरू केले. गेल्या वर्षी लकडावालाची मुलगी शिफा हिच्या खोट्या पासपोर्ट प्रकरणातील अटकेनंतर लकडावाला मुंबई पोलिसांच्या सापळ्यात अडकला.

दाऊद आणि छोटा शकील यांच्यात असणाया संबंधांबाबतही लकडावालाने काही खुलासे केले आहेत. गुन्हे शाखेला या दोघांमधील संबंधांबाबत माहिती दिल्यानंतर लकडावालाला ठार करण्याचा प्रयात्न करण्यात आला होता. मात्रा त्यामध्ये लकडावालाचा जीव जाता जाता वाचला. पॉईंट ब्लॅंक रेंजवरून हा लकडावालाच्या छातीवर गोळीबार करण्यात आला. पण त्या हल्ल्यातून लकडावाला थोडक्‍यात बचावला.

WebTittle ::  Ejaj Lakdawala Once Planned Dawood killing


संबंधित बातम्या

Saam TV Live