एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं, 17 ऑक्टोबरला राष्ट्रवादीत करणार प्रवेश - सूत्र

साम टीव्ही
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या भाजपचे ज्येष्ठ नेते  एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश जवळपास निश्‍चित झाल्याची चर्चा आहे. येत्या शनिवारी या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्‍यता आहे. कारण, खडसे यांचा राष्ट्रवादीमध्ये घटस्थापनेच्या मुहूर्तावर म्हणजेच 17 ऑक्‍टोबर रोजी प्रवेश होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

येत्या 17 ऑक्टोबरला एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आसण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या भाजपचे ज्येष्ठ नेते  एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश जवळपास निश्‍चित झाल्याची चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रवेश जवळपास निश्‍चित झाल्याची चर्चा आहे. येत्या शनिवारी या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्‍यता आहे. कारण, खडसे यांचा राष्ट्रवादीमध्ये घटस्थापनेच्या मुहूर्तावर म्हणजेच 17 ऑक्‍टोबर रोजी प्रवेश होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील संघटनात्मक पद व आमदारकी देण्यावर पक्षांतराचे हे "सूत्र' ठरल्याचेही सांगितले जात आहे. 

देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून खडसे पक्षावर नाराज आहेत. भाजपने त्यांना 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीही नाकारली होती. त्यानंतर विधान परिषदेवरही त्यांना संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांनी नाराजी वाढून गेल्या महिन्यात खडसे यांनी थेट फडणवीसांचे नाव घेऊन टीका केली होती. तेव्हापासून खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. 

खडसेंना मंत्रिपदाचं आश्वासन

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन आठवड्यांपूर्वी चाचपणी केली होती. खडसे हे गेल्याच आठवड्यात मुंबईला जाऊन आले आहेत. त्याच वेळी खडसे- पवारांच्या भेटीची चर्चा रंगली होती; परंतु प्रत्यक्षात भेट झाली नसल्याचे दोन्ही बाजूने नाकारण्यात आले होते.

मात्र, या मुंबईवारीतच खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाचे सूत्र काय असेल, हे ठरल्याचे बोलले जात आहे. पक्षप्रवेशानंतर संघटनात्मक पद, विधान परिषदेचे सदस्यत्व असे सूत्र यामागे ठरले असून ठाकरे सरकारच्या पुढील मंत्रिमंडळ विस्तारात खडसे यांना मंत्रिपद, असे सूत्र ठरल्याचे सांगितले जात आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live