कोरोना संसर्ग नातूपर्यंत पसरण्याच्या भीतीने वृद्ध जोडप्याने केली आत्महत्या 

साम टीव्ही ब्युरो
सोमवार, 3 मे 2021

रविवारी सकाळी चंबळ ओव्हर ब्रिज जवळील दिल्ली मुंबई अप लाईन ट्रॅकवर एका कोरोनाव्हायरस-पॉझिटिव्ह जोडप्याने दिल्लीच्या ट्रेनसमोर उडी मारली.

राजस्थान: सत्तरीच्या दशकात असलेल्या एका कोरोना Corona पॉझिटिव्ह जोडप्याने रविवारी चालत्या ट्रेनच्या समोर उडी मारून आत्महत्या Suicide केली आहे. या आत्महत्येचे कारण सांगण्यात येत आहे कि,  त्यांना भीती वाटली की कदाचित त्यांच्या नातवंडाला Grandson सुद्धा हा संसर्ग होऊ शकेल. Elderly couple commit suicide for fear of spreading corona infection to grandchildren

हीरालाल बैरवा (वय ७५) आणि त्यांची पत्नी शांतीबाई (वय ७०) हे शहरातील पुरोहितजी की टपरी भागात आपल्या १८ वर्षाच्या नातू आणि सुनेसह राहत होते. वृद्ध दांपत्याच्या मुलाचा आठ वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

२९ एप्रिल रोजी त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती आणि तेव्हापासून त्यांना होम क्वारंटाईन Home Quarantine म्हणजेच घरी ठेवण्यात आले होते, अशी माहिती रेल्वे कॉलनी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश चंद शर्मा यांनी दिली. रविवारी सकाळी चंबळ ओव्हर ब्रिजजवळ दिल्ली मुंबई अप लाईन ट्रॅकवर या जोडप्याने चालत्या ट्रेनच्या समोर उडी मारली. Elderly couple commit suicide for fear of spreading corona infection to grandchildren

फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) CrPC च्या कलम १७४ नुसार अप्राकृतिक मृत्यू Unnatural Death गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि कोविड -१९ च्या प्रोटोकॉलनुसार मृतदेह अंतिम संस्कारांसाठी पाठविण्यात आले आहेत. प्रारंभिक चौकशीत असे दिसून आले आहे की,  त्यांचा एकुलता नातू आणि कुटुंबातील इतर सदस्य कोरोनाव्हायरस संसर्गामुळे बाधित होऊ शकतात अशी भीती या जोडप्याला होती. त्यामुळे रविवारी पहाटे दोघांनी घर सोडले आणि आपले जीवन संपवण्याचे अत्यंत कठोर पाऊल उचलले अशी माहिती देण्यात आली आहे.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live