VIDEO | ठाकरेंचा महाराष्ट्र व्हेंटिलेटरवर, वाचा प्रशासनाचा अक्षम्य गलथान कारभार

साम टीव्ही
सोमवार, 31 ऑगस्ट 2020
  • औरंगाबादेत वृद्ध महिलेला भररस्त्यात ऑक्सिजन
  • औरंगाबादमध्ये प्रशासनाचा अक्षम्य गलथान कारभार
  • पतीचं 2 दिवसांआधी निधन, कोरोनाग्रस्त आजीची परवड

आता बातमी प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणाची. औरंगाबादच्या एका कोरोनाग्रस्त वृद्ध महिलेवर ज्या प्रकारे उपचार केलेत ते पाहून कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. प्रशासनाने दाखवलेली असंवेदनशीलता पाहून ठाकरेंचा महाराष्ट्र व्हेंटिलेटरवर आहे की काय. असा प्रश्न पडतोय?.

आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा कोणत्या थराला गेलाय, याचं हे मूर्तिमंत उदाहरण... या वयोवृद्ध आज्जी आहेत औरंगादमधील... दोन दिवसांआधीच त्यांच्या पतीचं कोरोनामुळे निधन झालंय. त्यातच घरातील सगळेच कोरोनाबाधित झाल्याची माहिती मिळतेय. आज्जींनाही कोरोनाने गाठलं... उपचारासाठी त्यांनी कोव्हिड सेंटरकडे धाव घेतली पण, बेड शिल्लक नसल्याचं कारण सांगत या आज्जींना चक्क रस्त्याकडेला झाडाखाली ऑक्सिजन लावून बसवून ठेवलं गेलं. कोव्हिड सेंटरमध्ये तब्बल 40 बेड उपलब्ध असूनही या आज्जींची भररस्त्यात झालेली परवड बघून प्रत्येकाच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

केवळ 50 दिवसच राहणार कोरोना लसीचा प्रभाव, दर 2 महिन्यांनी घ्यावी लागणार कोरोना लस 

कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी प्रशासन संपूर्णपणे सज्ज असल्याचा घोषणा सरकारने नेहमी केल्या. पण त्या केवळ पोकळ बाता असल्याचं यानिमित्ताने समोर आलंय.

कोरोनामुळे आधीच पतीचा मृत्यू, संपूर्ण कुटुंबासह स्वत:लाही कोरोनाची लागण अशा तिहेरी संकटात सापडलेल्या या आज्जींना रस्त्यावर ऑक्सिजन लावलं गेलंय. त्यामुळे ठाकरेंचा हा महाराष्ट्र व्हेंटिलेटरवर असल्याचं समोर आलंय.

सोशल मीडियावर आज्जींचे फोटो व्हायरल झाल्यावर प्रशासन जागं झालं. आज्जींना घाटी रुग्णालयात दाखलही करण्यात आलं.
 
प्रशासनाचा हलगर्जीपणा संतापजनक आहे. कोरोनाची लागण झालेल्या एका वयोवृद्ध आज्जींना अशा प्रकारे भररस्त्यात ऑक्सिजन लावला जात असेल तर, गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाची असंवेदनशीलता लाज वाटावी अशीच आहे.  त्यामुळे, ठाकरे सरकारचा हा महाराष्ट्र आणि आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर असल्याचं चित्र निर्माण झालंय.


संबंधित बातम्या

Saam TV Live