#coronavirusindia | 26 मार्चला होणारी राज्यसभेची निवडणूक पुढे ढकलली

सोनाली शिंदे
मंगळवार, 24 मार्च 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी भारतात ३० राज्य-केंद्रशासित प्रदेश 'लॉकडाऊन आहेत. तर  महाराष्ट्र-पंजाबमध्ये 'कर्फ्यू' लागू करण्यात आलाय. त्यामुळे ही निवडणुक पुढे ढकलण्यात आलीय.

नवी दिल्ली -  26 मार्चला होणारी राज्यसभेची निवडणूक पुढे ढकलण्यात आलीय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी भारतात ३० राज्य-केंद्रशासित प्रदेश 'लॉकडाऊन आहेत. तर  महाराष्ट्र-पंजाबमध्ये 'कर्फ्यू' लागू करण्यात आलाय. त्यामुळे ही निवडणुक पुढे ढकलण्यात आलीय. दरम्यान महाराष्ट्रात ही निवडणूक बिनविरोध झाल्याने प्रश्न नाही, पण गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

 

TWEET - 

 

महत्त्वाचं म्हणजे आज पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार आहेत. आज रात्री 8 वाजता मोदी देशवासियांशी संवाद साधणारंयत...ट्विट करुन पंतप्रधान मोदींनी ही माहिती दिलीय. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मोदी नेमकं काय बोलणार याकडं लक्ष लागलंय. दरम्यान याआधी 19 मार्चला मोदींनी देशवासियांशी संवाद साधला होता, आणि लोकांना काळजी घेण्याचं आवाहन करतानाचं जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. त्यामुळे आजही मोदी अशीच एखादी मोठी घोषणा करतात का याकडे लक्ष लागलंय. 

TWEET - 

मुंबईत कोरोनोचा आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. 65 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे आता मुंबईत मृतांचा आकडा आता 3वर गेला आहे. देशभरात कोरोनमुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

TWEET - 

 

 

 

सांगलीमध्ये कोरोनाचे  चार रुग्ण आढळून आल्याने सांगली जिल्ह्याने याची धास्तीती घेतली आहे. जिल्ह्यात पोलीस आणि प्रशासन यांनी कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. सांगलीच्या ग्रामीण भागात काही गावांनीही बाहेरील नागरिकांना गावबंद केलंय.सांगली जवळच्या हरिपूर गावाने  सांगली मधून नागरिक आत अथवा बाहेर जाऊ नये यासाठी चक्क रस्त्यावर ट्रक उभे केले आहेत.
 

election-commission-of-india-eci-has-deferred-the-rajya-sabha-elections-amid-covid1

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live