संबंधित बातम्या
राज्यभरात मराठा आंदोलकांनी एल्गार पुकारलाय. पोलिस भरती करण्याच्या निर्णयामुळे...
दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत...
कोल्हापूरची सर्वात मोठी आर्थिक सत्ता असलेल्या गोकुळ दूध संघाची निवडणूक येत्या दोन-तीन महिन्यात जाहिर होईल. गोकुळच्या इतिहासातील सर्वात मोठा संघर्ष या निवडणुकीत पहायला मिळणाराय
कोल्हापूरची सर्वात मोठी आर्थिक सत्ता असलेल्या गोकुळ दूध संघाची निवडणूक येत्या दोन-तीन महिन्यात जाहिर होईल. गोकुळच्या इतिहासातील सर्वात मोठा संघर्ष या निवडणुकीत पहायला मिळणाराय. त्यामुळे जिल्ह्यातलं राजकारण आतापासूनच तापायला लागलंय.
गोकुळ दूध संघ. जसं संघाचं नाव गोकुळ तसाच काहीसा अनुभव संघावर निवडणून जाणाऱ्या संचालकांना येतो. गोकुळ दूध संघात मिळणारा मलिदा दणक्यात असल्यानं दिग्गजांसह हौसे नौसे गौसे अशा सगळ्यांनाच या निवडणुकीसाठी तयारी सुरू केलीय. गोकुळची सत्ता जवळ असलं की जिल्हयातील सर्वच संस्थांमध्ये अस्तित्व ठेवता येतं असा प्रघात आहे. यामुळे गोकुळच्या सत्तेसाठी काहीही, असा प्रयत्न नेत्यांचा असतो.
गोकुळची सत्ता अनेक वर्षांपासून महादेवराव महाडिक आणि पीएन पाटील यांच्या गटाकडे आहे.
त्यांच्यापुढे आव्हान उभं करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी मोर्चेबांधणी केलीय. तर सत्ताधाऱ्यांना हातची सत्ता जाऊ द्यायची नाहीय. त्यामुळे महादेवराव महाडिक गटही जोरदार कामाला लागलाय.
तर मागल्यावेली महाडिक गटाबरोबर असलेले हसन मुश्रीफ यावेळी कुणासोबत असणार अद्याप स्पष्टता नाहीय.. त्यामुळे मुश्रीफांच्या भूमिकेकडेही जिल्ह्याचं लक्ष लागलंय. जिल्हा बँकेचं राजकारण डोळ्यांसमोर ठेऊन हसन मुश्रीफ महाडिकांनाच साथ देतील असाही अंदाज वर्तवला जातोय. जर राजकीय साटंलोटं झालं तर मात्र त्याचा फटका सतेज पाटलांना बसू शकतो
गोकुळच्या निवडणुकीला अजून 2 ते 3 महिन्यांचा कालावधी आहे. मात्र आत्तापासूनच ऐन थंडीत कोल्हापूरचं राजकारण तापायला लागलंय. जशी निवडणुक जवळ येईल तसं संघर्ष आणि शह, काटशहाचं राजकारण शिगेला पोहोचेल हा गोकुळच्या निवडणुचा इतिहास आहे.