कोरोना योध्यांसाठी 12 वर्षाच्या मुलाने बनवला ईलेक्ट्रॉनिक पेन 

abu abbas.jpg
abu abbas.jpg

वृत्तसंस्था : देशभरात कोरोनाच्या Corona virus  वाढत्या रुग्णसंख्येमुळे patients अद्यापही चिंताजनक परिस्थिती आहे.  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर देखील युद्धपातळीवर लढत आहेत. अशातच जम्मू काश्मीरच्या jammu kashmir  एक दुर्गम भागात राहणाऱ्या एका 12  वर्षांच्या मुलाने कोरोना योध्यांसाठी एक  इलेक्ट्रॉनिक पेन बनवला आहे. विशेष म्हणजे कॉपरची तार copper  आणि कॉटन Cotton  या दोन गोष्टींचा वापर करून हा पेन बनवल्याचे त्याने सांगितले आहे. अबू अब्बास असे या मुलाचे  नाव आहे.  (An electronic pen made by a 12-year-old boy for Corona Warriors) 

मिळालेल्या माहितीनुसार, अबू अब्बास जम्मू काश्मीरच्या राजौरी Rajouri  या दुर्गम भागत राहतो.  हा इयत्ता सातवीत शिकणारा मुलगा आहे. मी हा पेन खासकरून कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी बनवला आहे.  रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर्स ग्लव्हज् घालतात, ज्यामुळे त्याना टचस्क्रीन फोन वापरता येत नाहीत.  अशावेळी डॉक्टरांना या पेनचा नक्की उपयोग होईल, असे मत अबू अब्बास ने व्यक्त केले आहे. 

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी देशभरात  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकूण 624 डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  इंडियन मेडिकल असोसिएशनने याबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे.  यात सर्वाधिक मृत्यू राजधानी दिल्लीत झाले आहे. दुसऱ्या लाटेत दिल्लीत एकूण 109 डॉक्टरांनी आपले प्राण गमावले आहेट. तर त्या खालोखाल बिहार मध्ये 96 तर उत्तरप्रदेशात 79 डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.  तर महाराष्ट्रात 23 डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.  तर पुददूचेरीत सर्वात कमी म्हणजे केवळ एका डॉक्टराचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

Edited By- Anuradha Dhawade 

    
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com