आजपासून इलेक्ट्रॉनिक्स व हार्डवेअरची दुकाने उघडणार

आजपासून इलेक्ट्रॉनिक्स व हार्डवेअरची दुकाने उघडणार

मुंबई: मुंबईत वाइन शॉप्स आणि अन्य काही अत्यावश्यक सेवेत न येणारी दुकाने उघडण्यास मुभा देण्यात आली होती.   वाइन शॉप्सबाहेर तळीरामांची मोठी गर्दी उसळल्याने व तिथे सोशल डिस्टन्सिंगचे व अन्य नियमांचे उल्लंघन होत असल्याने मंगळवारी रात्री उशिरा नवा आदेश काढून ही परवानगी रद्द करण्यात आली. जीवनावश्यक वस्तू व औषधांची दुकाने सोडून अन्य कोणतीही दुकाने उघडण्यास मनाई करणारा आदेश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी काढला. 

प्रत्येक रस्त्यावरील केवळ एक इलेक्ट्रॉनिक्स व एक हार्डवेअर दुकान उघडता येईल, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. आजपासून हा आदेश लागू असणार आहे.मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी ५ मे रोजी काढलेल्या आदेशात सुधारणा करत जीवनावश्यक वस्तू व औषध दुकानांबरोबच इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरची दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. 

मंत्रिमंडळ बैठकीतही काही मंत्र्यांनी यावर नाराजी व्यक्त केल्याचे कळते. या सर्व पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री उशिरा आयुक्तांनी पुन्हा एक सुधारित आदेश काढत मुंबईतील हार्डवेअर व इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने सुरू ठेवण्यास अनुमती दिली आहे.अनेक अत्यावश्यक आणि जीवरक्षक वैद्यकीय उपकरणे, अद्ययावत यंत्रणा, मशीन्स, वाहने यांत बिघाड झाल्यास गैरसोय होऊ नये म्हणून इलेक्टॉनिक्स व हार्डवेअरची दुकाने सुरू राहणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. पालिका आयुक्तांनी आपल्या विशेषाधिकारात काढलेल्या या आदेशावरून आज उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. एकल दुकाने उघडता येतील व एका लेनवर प्रत्येकी एकच दुकान उघडण्यास परवानगी असेल. सहाय्यक आयुक्तांनी याची काटेकोरपणे पालन करायचे आहे, असे आयुक्तांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.

WebTittle :: Electronics and hardware stores will open from today


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com