काश्मिरात भारतीय लष्कराचं ऑपरेशन ऑल आऊट, 22 दहशतवाद्यांसह 6 टॉप कमांडर्सचा खात्मा

साम टीव्ही
सोमवार, 8 जून 2020
  • काश्मिरात भारतीय लष्कराचं ऑपरेशन ऑल आऊट
  • 15 दिवसात 9 ऑपरेशन्स
  • 22 दहशतवाद्यांसह 6 टॉप कमांडर्सचा खात्मा

एकीकडे देश कोरोनाशी झुंजतोय. तर दुसरीकडे तिकडे काश्मिरात सैन्यानं ऑपरेशन ऑल आऊट हातात घेत दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलंय. 

एकीकडे देश कोरोनाशी झुंजत असताना भारतीय लष्करानं काश्मिरात ऑपरेशन ऑल आऊट हाती घेतलंय. 15 दिवसात 9 ऑपरेशन राबवत 22 अतिरेक्यांचा खात्मा भारतीय लष्करानं केलाय. यात 6 टॉप कमांडर्सचाही समावेश आहे. हिजबुल मुजाहिदीन, लष्कर ए तोयबा, जैश ए महंमद या काश्मिरातील प्रमुख दहशतवादी संघटनांचं कंबरडं भारतीय लष्करानं मोडलंय.

बारामुल्ला जिल्हा दहशतवादी-मुक्त जिल्हा म्हणून आधीच जाहीर झालाय. आता नौशेरा, राजौरी, मेंढर, पूँछ सेक्टरसह शोपिया जिल्ह्यात भारतीय लष्करानं दहशतवाद्यांना सळो की पळो करुन सोडलंय. एकीकडे देश कोरोनामुक्त करण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर झुंजतायंत तर दुसरीकडे काश्मिर खोरं दहशतवादमुक्त करण्यासाठी भारतीय लष्करही पावलं उचतंय.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live