PHOTO : ब्रिटनमध्ये कुत्र्यांसाठी चित्रपटाची स्पेशल स्क्रिनिंग; मोडला अनोखा रेकॉर्ड

ब्रिटनमध्ये कुत्र्यांनी एक अनोखा रेकॉर्ड केला आहे. एक नाही, दोन नाही तब्बल १२७ कुत्र्यांनी मिळून '101 डाल्मेशन' चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती.
Britan Dog's Special Screening
Britan Dog's Special Screening Saam Tv

मुंबई: आपण नेहमी चित्रपट पाहायला जातो. जर तुम्हाला आम्ही सांगितले की, कुत्र्यांनी चित्रपट पाहिला तर? ब्रिटनमध्ये (Britan) हा प्रकार घडला आहे. ब्रिटनमध्ये कुत्र्यांनी एक अनोखा रेकॉर्ड केला आहे. एक नाही, दोन नाही तब्बल १२७ कुत्र्यांनी मिळून '101 डाल्मेशन' (101 dalmatians) चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. अनोखा रेकॉर्ड केल्यानंतर १२७ कुत्र्यांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Records) नोंद केली आहे. काही दिवसांपूर्वी डॉग बोर्डिंग बिझनेस ओनर रेचल मेरी शंभरहून अधिक श्वानांसाठी खास स्क्रिनिंगचे आयोजन केले होते.

Britan Dog's Special Screening
कंगना रणौतनं शेअर केले सेटवरचे फोटो, म्हणाली....

कुत्र्यांना सिनेमा दाखवून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा अनोखा प्लॅन डॉग बोर्डिंग बिझनेस ओनर रेचलने तयार केला होता. आधी हा सिनेमा २०० कुत्र्यांना दाखवण्याचा विचार करण्यात आला होता. याआधीही अशाप्रकारची स्क्रिनिंग झाली होती. मात्र मेरीच्या या स्क्रिनिंगने मागचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. यावेळी हा कार्यक्रम वर्सेस्टरच्या पर्डिसवेल लेझर सेंटरमध्ये आयोजित केला होता. मागच्या रेकॉर्डमध्ये २०१९ या वर्षात १२० कुत्र्यांनी ब्राझीलमध्ये 'द सीक्रेट लाईफ ऑफ पेट्स 2' च्या स्क्रिनिंगमध्ये हजेरी लावली होती.

Britan Dog's Special Screening
Atithi Bhooto Bhava: हॉरर कॉमेडी 'आतिथी भूतो भव:' चा ट्रेलर आला; एकदा बघाच!

हा विनोदी सिनेमा '101 डाल्मेशन' कुत्र्यांनी पाहिला कारण, तो सिनेमा कुत्र्यांवर चित्रीत करण्यात आला होता. वर्ल्ड डिस्नी पिक्चरची ही कथा कुत्र्यांवर आधारित आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन स्टीफन हेरेक यांनी केले आहे. यामध्ये फॅशन डिझायनर रोजर यांचा डॅल्मेशियन जातीचा पाळीव कुत्रा पोंगो नावाच्या कुत्र्याच्या प्रेमात पडतो. तर पेरडिटाची मालकीन फॅशन डिझायनर अनीता कँपबेल असते. कुत्र्यांचे मालक एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि लग्न करतात. त्यानंतर पोंगो आणि पेरिडिटा या दोघांचेही लग्न होते. यामध्ये पेरिडिटा गरोदर राहते आणि 15 पिल्लांना जन्म देते. फॅशन डीझायनर अनिता कॅम्पबेलची मालकीण कुत्र्यांच्या केसांच्या कोटसाठी वेडी असते... त्यासाठी ती पेरडिटाच्या पिल्लांच्या मागे पडलेली असते. या सिनेमात अनिता आणि जर त्यांच्या पिल्लांना वाचविण्यासाठी काय करतात त्याची गोष्ट आहे.

Edit By- Chetan Bodke

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com