Movie Release: या आठवड्यात मनोरंजनाचा फुल्ल तडका, मराठीसह २८ चित्रपट थिएटर्समध्ये झळकणार

११ नोव्हेंबरला सिनेमागृहांमध्ये हिंदीतील तब्बल ८ चित्रपट प्रदर्शित होत आहेत.
28 Movie Release on Box Office
28 Movie Release on Box OfficeSaam Tv

Movie Release This Week: या आठवड्यात सिनेमागृहांत तब्बल २८ सिनेमे प्रदर्शित होत आहेत. मराठीत दोन चित्रपट, तर हिंदीत एकाचवेळी आठ चित्रपट आपले नशीब आजमावणार आहेत.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तीन हिंदी सिनेमे आले होते, या सिनेमांकडून बऱ्याच अपेक्षा होत्या, पण बॉक्स ऑफिसवर तिन्ही सिनेमे दणकून आपटले. त्यामुळे चित्रपटसृष्टीत काहीसे निराशाजनक वातावरण होते. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा एकाच वेळी अनेक सिनेमे प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हे सिनेमे चांगली कमाई करणार का किंवा या कमाईतही वाटणी होणार का, असे अनेक प्रश्न येत आहेत.

28 Movie Release on Box Office
Sakal Maratha Samaj: पिंपरी-चिंचवडनंतर आता सोलापुरातही 'हर हर महादेव' चित्रपटचा शो बंद

एकाचवेळी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमांची ही यादी

हिंदीत एकावेळी आठ सिनेमे प्रदर्शित होणार

येत्या ११ नोव्हेंबरला सिनेमागृहांमध्ये हिंदीतील तब्बल ८ चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यातील काही चित्रपटांत बडे कलाकार असणार आहेत. त्यामुळे हे सिनेमे प्रेक्षकांना कितपत भुरळ घालतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.  दक्षिणेतील सुपरस्टार समांथा रुथ प्रभू चा 'यशोदा' , अमिताभ आणि अनुपम खेरचा  'ऊंचाई' या दोन सिनेमांबरोबरच रितेश देशमुखचा  'मिस्टर मम्मी'सुद्धा ११ नोव्हेंबरलाच प्रदर्शित होतो आहे. त्याचबरोबर 'अंत द एंड', 'थाय मसाज', 'रॉकेट गँग', 'करतूत'  आणि 'बधाई हो बेटी हुई है'  हे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. (Bollywood)

मराठीत दोन चित्रपट प्रदर्शित

या आठवड्यात ११ नोव्हेंबरला 'गोदावरी'  आणि 'कुलस्वामिनी' हे दोन सिनेमे प्रदर्शित होत आहेत.  जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, मोहीत टाकळकर, गौरी नलावडे असे कलाकार असलेल्या  'गोदावरी' चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठीची दखल घ्यायला लावली आहे.

तेलुगू भाषेतील दोन चित्रपट

यशोदाशिवाय तेलुगूमध्ये एक चित्रपट येतो आहे. 'माधी' हा सिनेमा त्याचं नशीब आजमावणार आहे.

Yashodha And Godavari Movie Poster
Yashodha And Godavari Movie PosterSaam Tv

तामिळ भाषेत चार सिनेमे

तामिळ भाषेत यावेळी 'यशोदा' प्रदर्शित होतो आहेच पण त्याचबरोबर  'आगिलन', 'गिला आयलैंड' आणि 'पैरोल' हे तिन्ही चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

कन्नडमध्ये पाच सिनेमे

कानडीत यावेळी अॅक्शन थ्रिलर 'यशोदा','राना', 'ओ कन्नडा', कॉमेडी ड्रामा फिल्म 'दिलपसंद'  आणि 'यलो गँग्स' है।  

मल्याळममध्ये सिनेमांचा चौकार

मल्याळम 'यशोदा', 'गिला आईलैंड', 'बेरमुडा' आणि 'शोहलाई' असे चार सिनेमे मनोरंजनाचा चौकार मारण्यासाठी सज्ज झालेले आहेत.

पंजाबी भाषेतील तीन फिल्म्स

पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतही या आठवड्यात तीन सिनेमे प्रदर्शित  होत आहेत.  'छोबर', 'कुल्चे छोले' आणि 'मसंद' हे तीन चित्रपट या आठवड्यात येत आहेत.  'कुल्चे छोले' या चित्रपटाद्वारे सोशल मीडिया स्टार जन्नत जुबैर पंजाबी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे. (Movie)

Gila Island And Kulche Chole Movie Poster
Gila Island And Kulche Chole Movie PosterSaam Tv

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com