Thank God : अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्राचा 'थँक गॉड' वादाच्या भोवऱ्यात ; नेमकं कारण काय?

'थँक गॉड' चित्रपटाचे अभिनेते अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्राशिवाय दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Thank God Movie
Thank God MovieSaam Tv

मुंबई : बॉलिवूडचा सिंगम अजय देवगण(ajay devgan) आणि चॅाकलेट बॉय सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांचा 'थँक गॉड'(Thank God) हा चित्रपट २४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला, जो लोकांना खूप आवडला. तेव्हापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र रिलीजपूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'थँक गॉड' अभिनेते अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्राशिवाय दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Thank God Movie
Jawan : रोमान्सचा बादशाह शाहरुख खान करणार २०० अभिनेत्रींसोबत अॅक्शन सीन

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'थँक गॉड'चे दिग्दर्शक इंद्र कुमार, अभिनेते अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्यावर लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. यूपीमध्ये राहणाऱ्या हिमांशू श्रीवास्तव नावाच्या वकिलाने 'थँक गॉड'चा ट्रेलर पाहिल्यानंतर या कलाकारांविरोधात जौनपूर कोर्टात तक्रार दाखल केली आहे.

Thank God Movie
Prajakta Mali : प्राजक्ता माळीची इच्छा हटके; मग काय चर्चा होणारच...व्हिडिओ झाला व्हायरल

उत्तर प्रदेश मधील जौनपूर कोर्टात हिमांशू श्रीवास्तव यांनी दाखल केलेल्या तक्रारीत असे लिहिले आहे की, 'चित्रगुप्त एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या-वाईट कर्माचा हिशोब ठेवतो, ज्याला कर्मदेवता देखील म्हटले जाते. पण चित्रपटात त्याचे चित्रण योग्य प्रकारे करण्यात आले नाही. यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात'.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'थँक गॉड'च्या ट्रेलरमध्ये चित्रगुप्ताला मॉडर्न लूकमध्ये सूट-बूट घातलेला दाखवण्यात आला आहे. शिवाय अजयच्या पात्राची भाषाही मिश्कील आहे. बरं, या तक्रारीचा निकाल काय लागतो, हे लवकरच कळेल. चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि अजय देवगण यांच्याशिवाय रकुल प्रीत सिंह देखील 'थँक गॉड'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २४ ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Edited By - Shruti Kadam

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com