Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : भिडे कुटुंब करणार जल्लोष, तरी का उतरला माधवी आणि भिडेंचा चेहरा!

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी श्री आत्माराम तुकाराम भिडे यांच्या कुटुंबासाठी फार वर्षानंतर आनंदाचा क्षण आला आहे.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Taarak Mehta Ka Ooltah ChashmahSaam Tv

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | मुंबई : टीव्हीवरील प्रसिद्ध विनोदी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah )मध्ये नेहमी काही ना काही मजेदार घडामोडी घडत असतात. यामुळे चाहतेही एपिसोड बघताना अगदी लोटपोट हसतात. गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी श्री आत्माराम तुकाराम भिडे यांच्या कुटुंबासाठी फार वर्षानंतर आनंदाचा क्षण आला आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Laal singh chaddha : आमिर खानविरोधात तक्रार; काय-काय आहेत आरोप?

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये गोकुळधाम सोसायटीतील सदस्य आनंदाने नाचत आहेत. बऱ्याच दिवसांनी भिडे कुटुंबात जल्लोषाचे वातावरण आहे. ही आनंदाची बातमी कळताच सोसायटीतील सदस्य आनंद साजरा करत आहेत. पण माधवी आणि भिडे यांचे चेहरे का उतरले आहेत? भिडे कुटुंबीय ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण समोर आहे, पण तरीही कोणीही आनंदी का दिसत नाही? नक्की प्रकरण काय आहे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Salman Khan: सलमान खानने शिकार केलेल्या 'त्या' काळवीटाचे स्मारक उभारले जाणार

त्याचे असे झाले की, भिडेने नवीन कार घेण्याचे ठरवले, तेव्हा तो सरळ सोढीकडे गेला आणि सोढीने भिडेला सेकंड हँड कार घेण्यासाठी नेले. तिथे भिडेलाही एक कार आवडली आणि सौदा झाला. मात्र, गोलीला संशय आल्याने तो पिंकूसोबत त्यांचा पाठलाग करतो आणि त्याला भिडे गाडी घेत असल्याचे समजते. मात्र भिडे, माधवी आणि सोनूला सरप्राइज देण्यासाठी गाडी घेण्याची बाब सर्वांपासून लपवली जाते. पण सोसायटीत आल्यानंतर लहान गोली पोपटलाल, अय्यर, डॉ. हाथी आणि जेठालाल यांना ही गोष्ट सांगतो, त्यामुळे आता त्यांनाही भिडेंच्या सरप्राइजची गोष्ट कळली आहे.

आता येणारा भाग खूप मजेदार असणार आहे. कारण गाडी गोकुळधाम सोसायटीत आल्याचे पाहून भिडे आणि माधवीचा चेहरा हिरमुसला आहे, हे दोघेच नाही तर सोढीही गाडी पाहून आश्चर्यचकित झाला आहे. गोकुळधामचे लोक आनंदोत्सवात मग्न असताना, भिडे, माधवी आणि सोढी यांना गाडी पाहून आनंद का होत नाही? हा प्रश्न आहे. यामागे नक्की काय प्रकरण आहे, हे येत्या एपिसोडमध्येच कळेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com