Malaika Arora : मलायका अरोराचा 'असा' बोल्ड लूक याआधी कधीच पाहिला नसेल; ट्रान्सपरंट...

बॉलिवूड फॅशनिस्टा आणि फिटनेस क्वीन मलायका अरोरा तिच्या लूक आणि स्टाइलमुळे चंदेरी दुनियेत नेहमीच 'सातवें आसमान'वर असते.
Malaika Arora
Malaika AroraSaamTv

मुंबई : बॉलिवूड फॅशनिस्टा आणि फिटनेस क्वीन मलायका अरोरा(Malaika Arora) तिच्या लूक आणि स्टाइलमुळे(Bollywood) चंदेरी दुनियेत नेहमीच 'सातवें आसमान'वर असते. जीम लूक असो किंवा रेड कार्पेट लूक, मलायकाला परफेक्ट कसं दिसायचं हे अगदी 'परफेक्ट' माहीत असतं. ४८ वर्षीय मालायकाला सोशल मीडियावरही फॅन्स मोठ्या संख्येने फॉलो करतात. मलायका वेळोवेळी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर चाहत्यांसाठी अनेक पोस्ट शेअर करत असते. दरम्यान, सोशल मीडियावर मलायकाची एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मलायका एका फॅशन शोसाठी रॅम्प वॉक करताना दिसत आहे.

Malaika Arora
Disha Patani Tiger Shorff : दिशा पटानी-टायगर श्रॉफच्या ब्रेकअपवर जॅकी श्रॉफ यांची प्रतिक्रिया

मलायका अरोराने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर थाई हाय स्लिट असलेल्या ब्लॅक बॉडी-हगिंग गाऊनमधील तिच्या ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केले आहेत. तिच्या लूकमध्ये आणखी बहर आणण्यासाठी मलायकाने तिचे केस मोकळे सोडले होते. ज्यामुळे मलायका आणखीनच हॉट दिसत होती. तिने न्यूड शेड लिपस्टिक आणि स्मोकी आय असा मेकअप केला होता. मलायकाने स्टेटमेंट पेंडेंट आणि स्ट्रॅपी हील्स परिधान करून तिचा लूक परिपूर्ण केला. मलायकाचे या लूकमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Malaika Arora
Friday Release: जुलैचा शेवटचा शुक्रवार मनोरंजनाने भरलेला; 'हे' चित्रपट - सिरीज होणार प्रदर्शित

दरम्यान, मलायका अरोरा हल्लीच तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत व्हॅकेशनसाठी पॅरिसला गेली होती. तेव्हा देखील या कपलचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. अर्जुन आणि मलायका काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. २०१९ मध्ये या दोघांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. अर्जुन कपूर ३६ वर्षांचा आहे, तर मलायका अरोरा ४८ वर्षांची आहे. त्यामुळे या दोघांच्या वयातील फरकामुळे या कपलला अनेकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे.

मलायका अरोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ती नृत्यदिग्दर्शक टेरेन्स लुईस आणि गीता कपूर यांच्यासोबत 'इंडियाज बेस्ट डान्सर' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून दिसली होती. याशिवाय मलायका फेमिना मिस इंडियाच्या जजिंग पॅनेलचाही एक भाग होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com