
मुंबई : बॉलिवूडची 'बागी गर्ल' अभिनेत्री दिशा पटानी(Disha Patani) तिच्या बोल्ड स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. दिशा पटानीचा एकापेक्षा एक बोल्ड आणि हॉट लूक नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. दिशाचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो. आताही दिशा पटानीचे असेच नवे रूप समोर आले आहे. त्याचबरोबर दिशाचा एक व्हिडिओ (Social Media)सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. वास्तविक, या व्हिडीओमध्ये दिशा वेस्टर्न लूकमध्ये नसून एथनिक लूकमध्ये दिसत आहे. पण चार पावलं चालताना ती दोनदा अडखळल्याचं दिसते.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिशा पटानी तिच्या कारमधून उतरल्याचे दिसते. अतिशय सुंदर हिरव्या रंगाच्या ड्रेस तिनं परिधान केला आहे. रेड कार्पेटवर ती चालत असून, ड्रेसमध्ये चालताना ती दोनदा अडखळली. दिशाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वास्तविक, यावेळी दिशाने फ्लॅट बेली घातली होती, असे असूनही तिला या ड्रेसमध्ये नीट चालताही येत नव्हते, असे या व्हिडिओत दिसते. त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.
दिशा बोल्ड लूकमध्ये असल्यावर तिच्यात आत्मविश्वास दिसतो. पण या एथनिक लूकमध्ये ती अस्वस्थ दिसत होती. अशा परिस्थितीत, सोशल मीडिया यूजर्सने भन्नाट कमेंट केल्या आहेत. ब्रॅलेट आणि वन पीससारखे कपडे परिधान केल्यानंतर दिशाला आता चुडीदारसारखे ड्रेस घालायची सवय राहिली नाही. तरीही दिशाने तिच्या लूकमध्ये वेस्टर्न टच दिला आहे. दिशाने परिधान केलेल्या ड्रेसमध्ये डीप नेकमुळे ती खूपच सुंदर दिसत आहे.
दिशा पटानी जेव्हा पडद्यावर झळकते, त्यावेळी नेहमी चाहते तिचे सौंदर्य पाहून घायाळ होतात. तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त, दिशा तिच्या लूक, ड्रेसिंग सेन्स आणि फिटनेसमुळे देखील चर्चेत असते. दिशा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहते. म्हणूनच नेटकऱ्यांना दिशाच्या नवीन लूकबाबत उत्सुकता असते.
दिशाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूरसोबत 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटात दिसणार आहे. यानंतर ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'योधा'मध्येही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.