Gauri Kulkarni: ‘आई कुठे काय करते’ फेम गौरी कुलकर्णीचा अपघात, पायाला गंभीर दुखापत

‘आई कुठे काय करते’ फेम गौरी कुलकर्णीचा दुचाकी चालवताना अपघात झाला असल्याची माहिती, तिच्या मैत्रीणीने एका इंग्रजी संकेतस्थळाला दिली आहे.
Gauri Kulkarni Accident
Gauri Kulkarni AccidentSaam Tv

Aai Kuthey Ky Karte Gauri Kulkarni Accident: ‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे गौरी कुलकर्णी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. सध्या तिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी येत आहे, नुकताच एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, दुचाकीवरुन प्रवास करत असताना तिचा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. तिच्या जवळच्या मैत्रिणीने एका इंग्रजी संकेतस्थळाला ही माहिती दिली आहे. अपघातात तिच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती सध्या मिळत आहे.

Gauri Kulkarni Accident
'पठान' नंतर ‘Tu Jhoothi Main Makkaar’ १०० कोटींच्या क्लबमध्ये; अवघ्या आठवड्यातच केली छप्पर फाड कमाई

गौरीच्या मैत्रिणीने सांगितले की, “गौरीचा अपघात झाला आहे. एका दुचाकीस्वाराने व्यवस्थित गाडी न चालवल्याने आमच्या दुचाकीचा अपघात झाला आहे. दुचाकीस्वार समोरुन येताच तो गौरीच्या गाडीच्या हँडलला ठोकला. गौरीची तब्येत सध्या व्यवस्थित असून तिच्या पायाला लागले आहे.”

अभिनेत्रीवर सध्या उपचार सुरू असून लवकरच गौरी घरी परतणार असल्याची माहिती तिच्या मैत्रीणीने दिली. मिळालेल्या माहितीनुसार, “ अपघातानंतर तिला किरकोळ जखमा झाल्या आहेत. गौरी आता अपघातातून बरी होत आहे. डॉक्टरांनी तिला जवळपास ३ आठवड्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. सध्या गौरीने सर्व शूटिंग्स आणि अनेक कार्यक्रम रद्द केले आहे. पायाला फ्रॅक्चर असल्याने डॉक्टरांनी काही काळासाठी बेड रेस्टचा सल्ला दिला आहे.”

Gauri Kulkarni Accident
Alka Kubal: ‘चर्चा रंगणार बातमी गाजणार’, तीन दशकानंतर ‘माहेरची साडी’चा सिक्वेल येणार?

गौरीच्या गाडीचे अपघातात नुकसान झाले असून सुदैवाने गौरी सुखरुप वाचली आहे. तिच्या पायाला डॉक्टरांनी फ्रेक्चर सांगितले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com