Aai Kuthe Kay Karte Serial Update: अरुंधतीचा वीणाला सल्ला, पण अनिरुद्धचा झाला संताप
Aai Kuthe Kay Karte Episode Update: 'आई कुठे काय करते' ही महाराष्ट्रातील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ही मालिका टीआरपीमध्ये देखील अव्वल आहे. सध्या वीणाच्या येण्याने वातावरण बदल आहे. अनिरुद्धाची वीणाला असलेली साथ देशमुख-केळकर कुटुंबाला अडचणीत टाकणारी आहे.
आई कुठे काय करते या मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये आशुतोष-अरुंधती आणि वीणा-अनिरुद्ध दिसत आहेत. आशुतोष वीणाला म्हणतो, 'तुला जेव्हा शक्य असेल तेव्हा आपण मालमतेची मालकी ट्रान्सफर करूया, हे डॉक्युमेंट वाचून घे.' त्यावर वीणाला आशुतोषला म्हणते, 'तुझ्या चेहऱ्यावर लिहिलं आहे.' एवढं बोलून वीणा त्या पेपर्सवर सही करायला घेते. (Latest Entertainment News)
पण अनिरुद्ध तिच्या हातातून पेन खेचून घेतो आणि म्हणतो, 'कितीही जवळच नातं असलं तरी न वाचता निर्णय घेतलेले चांगले नसतात.' अनिरुद्धच्या या वागण्याने आशुतोष आणि वीणा दोघांनाही धक्का बसतो.
नंतर वीणा अनिरुद्धकडे ते पेपर्स देते आणि म्हणते, 'चल वाचूया.' अनिरुद्ध पेपर घेतो त्यावर अरुंधती, वीणाला म्हणते 'पेपर तू वाचणार आहेस ना मी ते तुझ्याकडे ठेव.' हे ऐकून अनिरुद्ध चिडतो आणि त्याचा तिळपापड होतो.
तर आजच्या भागाचा आणखी एक प्रोमो स्टार प्रवाहच्या सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये वीणा केळकरांच्या घरामध्ये प्रवेश करते. घरात जाताच तिच्या जुन्या आठवणी जाग्या होतात. तिला तिच्या आई वडिलांची आठवण येते. त्यांचा अपघात तिला आठवतो. तिच्या बोलण्याने सगळे भावून होतात. आजच्या भागात आपल्याला वीणाची इमोशनल बाजू दिसणार आहे. (Serial)
नुकताच ईशा-अनिशचा साखरपुडा पार पडला आहे. या साखरपुड्यादरम्यान गोष्टी समोर आल्या. तर अनिरुद्धने देखील वीणाला तेव्हाच बिजनेस पार्टनर म्हणून सर्वांची ओळख करून दिली. तर हा अनिरुद्धचा नवा डाव असल्याची कुणकुण अरुंधतीला लागली आहे. तसे तिने आशुतोष जवळ बोलून दाखवले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.