
Madhurani Prabhulkar Upcoming Show: ‘आई कुठे काय करते’ फेम अरूंधती सध्या कमालीचे चर्चेत आहे. अरूंधतीची चाहत्यांमध्ये मधुराणी म्हणून नाही तर, अरूंधती म्हणूनच सर्वाधिक आहे. मधुराणीचे अभिनयावरील प्रेम आपण नेहमीच कामातून आतापर्यंत पाहात आलोय. सोबतच तिचे कवितेवरही विशेष प्रेम आहे. अनेकदा तिने सोशल मीडियावर काही प्रसिद्ध कवींच्या कविता देखील शेअर केल्या आहेत. ‘कवितेचे पान’ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तिने अनेक कवींच्या मुलाखती घेतल्या आहेत. आता हेच काम ती परदेशात अर्थात ऑस्ट्रेलियामध्ये करतानाही दिसणार आहे.
‘कवितेचे पान’ या युट्यूब शोमध्ये विविध सेलिब्रिटी, अनेक कवींसोबत मधुराणी कवितेविषयी चर्चा करते. मधुराणीच्या या युट्यूब शोमध्ये अनेक सेलिब्रिटींना यायलाही फार आवडतं. अनेकदा सेलिब्रिटींनी मधुराणीच्या शोमध्ये बालकवी, कुसुमाग्रज, इंदिरा संत या दिग्गज कवींचे काव्यवाचन या शोमध्ये केले. या शो संदर्भातील संकल्पना आणि दिग्दर्शन मधुराणी प्रभुलकरचे आहे. याआधी भारतात युट्यूब शो करणारी मधुराणी आता कवितेच्या माध्यमातून चाहत्यांच्या माध्यमातून भेटीला येणार आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Entertainment News)
अरूंधती आपल्या मालिकेचे शूटिंग आटोपून ऑस्ट्रेलियामध्ये सध्या सुट्टीचा आनंद घेताना दिसली. जरी अरूंधती परदेशात गेली असली तरी, तिथून ती आपल्या शोसाठी काम करताना दिसली. सुट्टीसाठी परदेशी गेलेली मधुराणी कामाप्रति असणारं प्रेम पाहून प्रेक्षक तिच्यावर कौतुकाचा वर्षावर करत आहे. ‘कवितेचे पान’ या युट्यूब शोसाठी तिने थेट पुढील एपिसोड ऑस्ट्रेलियामध्ये शूट करण्याचा विचार केला आहे. परदेशात शूट करत असलेल्या शोमध्ये गेस्ट भारतातील नसून ऑस्ट्रेलियातील नागरिकच तिच्या शोचे मेन गेस्ट आहे. सिडनीमध्ये राहणाऱ्या आणि मराठी भाषेवर अपार प्रेम करणाऱ्या व्यक्तीने तिच्या शोमध्ये एन्ट्री केली. (Marathi Actress)
मधुराणी हा व्हिडीओ शेअर करत म्हणते, “सिडनी ‘कवितेचे पान’ प्रेप्स... सिडनीमध्ये अनेक वर्ष राहणाऱ्या तरीही आपल्या भाषेवर आणि साहित्यावर प्रचंड प्रेम करणाऱ्या कविमनांच्या काही मंडळीबरोबर ‘कवितेचे पान’ चा ३ भाग चित्रित केला. एक सुखद अनुभव... एपिसोड लवकर येईल.” यावेळी मधुराणीच्या आगामी एपिसोडमध्ये सिडनीतील मराठी नागरिकाने सादर केलेल्या कवितेचा आस्वाद घेता येणार आहे.
नुकतंच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेची शूटिंग आटोपून मुलगी स्वरालीसोबत ऑस्ट्रेलियात सुट्टीचा आनंद लुटला. सध्या मुलीच्या शाळेला सुट्टी असल्याने आणि तिच्या कामातून फावला वेळ काढत अरूंधतीने काही वेळासाठी ब्रेक घेत ऑस्ट्रेलिया गाठलं. तिच्या नसण्याने मालिकेच्या कथानकात देखील बदल करावा लागला असून मालिकेत ती तिच्या गाण्यासाठी ‘वर्ल्ड टूर’ला गेली असल्याचे दाखवले. मधुराणी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच ती नवनवीन अपडेट शेअर करत असते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.