Aai Kuthe Kay Karte Dahi Handi Special
Aai Kuthe Kay Karte Dahi Handi SpecialSaam TV

Aai Kuthe Kay Karte Update: देशमुखांवर नवं संकट; दहीहंडीच्या दिवशी संजनाचा मोठा अपघात

Aai Kuthe Kay Karte Latest Episode: देशमुखांच्या घरी दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

Sanjana Mate With An Accident:

आई कुठे काय करते ही मालिका महाराष्ट्राच्या घराघरात पाहिली जाते. या मालिकेचा टीआरपी देखील हाय आहे. मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. ईशा - अनिशच्या लग्नानंतर मालिकेत काय नवीन पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

आई कुठे काय करते ही मालिकांचे नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये देशमुखांच्या घरी दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. या उत्साहात सगळेच सहभागी झाले आहेत.

Aai Kuthe Kay Karte Dahi Handi Special
Thalaivar 171: 'जेलर'च्या यशानंतर रजनीकांत यांचा नवा चित्रपट, 'थलाईवर १७१'ची घोषणा

आई कुठे काय करतेच्या प्रोमोची सुरुवात 'बजरंग बली की जय'ने होते. मुलांची आणि मुलींची अशा दोन टीम हंडी फोडण्यासाठी सज्ज असतात. यश ढोल वाजवत असतो आणि निखिल कृष्ण बनलेला असतो. मुलींची टीम हंडी फोडण्यासाठी थर रचतात. संजना हंडी फोडण्यासाठी वरच्या थरावर जाते. इतक्यात तिची नजर अनिरुद्धंवर जाते. ती हंडी फोडायची सोडून स्तब्ध होते आणि विचार करू लागते. तेवढ्यात खालचे थर कोसळतात आणि संजना खाली पडते.

संजना खाली कोसळून जमिनीवर पडते. इतकाच नाही तर ती बेशुद्ध होते. सगळे घाबरतात आणि तिच्या जवळ गोळा होऊन तिला उठविण्याचा प्रयत्न करतात. अनिरुद्ध मात्र दुरून हे सगळं पाहत असतो आणि मजा घेत असतो. (Latest Entertainment News)

'आई कुठे काय करतो'मध्ये काय सुरू आहे

दहीहंडीनिमित्त इशा, निखिल आणि अरुंधती देशमुखांच्या घरी येतात. निखिल एक पत्र अरुंधतीला देतो. हे पत्र निखिलला गायत्रीने दिलेले असत. शेखर, गायत्रीशी लग्न करणार आहे. आई - बाबांकडे राहता येणार यासाठी निखिल खूप आनंदी असतो. मात्र संजना याने दुखावली जाते. निखिल तिच्यापासून दार जाणार अशी भीती तिला वाटते.

अनिरुद्ध, संजनाला तू एकटी पडली असे हिणवतो. अरुंधती संजनाची समजूत काढते आणि सांगते निखिलचं तिच्यावर खूप प्रेम आहे. संजनाला अरुंधतीचं म्हणणं पटतं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com