
Aai Kuthe Kay Karte Today Episode: ‘आई कुठे काय करते ’ या मालिकेत सध्या दिवसेंदिवस ट्विस्ट येतोय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खरी सुरूवात झाली ती, वीणाच्या एन्ट्रीपासून. वीणाच्या एन्ट्रीपासून घरात कुलकर्णी कुटुंबीयांमध्ये वादाचे खटके उडत आहेत. अनेकदा संजनाने अनिरूद्धला तु सर्व काही सुरळीत चालू असताना तू का? वाद निर्माण करतोय असा प्रश्न विचारला होता.
अनिरूद्ध सध्या सर्वांमध्ये फुट पाडण्याचे काम करत असून मालिकेमध्ये काल आलेल्या वीणामध्ये आणि आशुतोषमध्ये ही तो सध्या फुट पाडायचं काम करतोय. मागच्याच भागात पाहिले की आशुतोष वीणाची कंपनी तिला सुपूर्त करताना अनिरुद्ध मुद्दाम तिला सगळी कागदपत्रे वाचून घे म्हणत त्यांच्यात दरी निर्माण करतो. आता मालिकेत आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे. (Entertainment News)
वीणाला आशुतोशची बिझनेसमध्ये मदत व्हावी यासाठी तिने एक कॉन्ट्रेक्ट केलं आहे. आता त्याच कॉन्ट्रेक्टमध्ये अनिरूद्धने वीणाच्या अपरोक्ष मोठा फेरफार बदल केला. अनिरूद्धने त्या कॉन्ट्रेक्टमध्ये बिझनेस पार्टनर म्हणून आशुतोषचं नाव काढून टाकत स्वत:चे तो नाव टाकतो. हा घोळ खरंतर कोणालाच कळत नाही. हे कळतं, नितीनला. अनिरूद्धने सर्व घोळ कोणालाच न कळता, कागदपत्रात फेरफार केले. चिडलेला नितीन आशुतोषला सर्व हकिकत सांगतो. त्याचवेळी वीणा दारात येते आणि ती मोठा गैरसमज करून घेते. यावेळी मानसिक ताण सहन न झाल्याने ती चक्कर येऊन कोसळते. याच संदर्भातला एक प्रोमो आता व्हायरल झाला आहे. (Marathi Film)
शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये, अनिरुद्ध संजनाला सांगतोय, मी सुद्धा वीणाच्या कंपनीत तिच्या बरोबरचा भागीदार झालो. मला कोणाच्या हाताखाली नोकरी करण्याची आता काही गरज नाही. त्यावर संजना म्हणते, अरेपण बिझनेस पार्टनर म्हणून आशुतोष होता ना... तर यावर अनिरूद्ध म्हणतो, त्या कंपनीतून मी ती जागाच आता काढून टाकली. मग हे आशुतोष हे मान्य केला? असा सवाल संजनाने अनिरूद्धने केला आहे. त्यावर अनिरूद्ध, नाही वीणाने त्या कॉन्ट्रॅक्ट वर सही केली. (Marathi Serial)
तर व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये पुढे घडते, आशुतोष आणि नितीन अनिरूद्धविषयी बोलत असताना, वीणा येताच तिचा गैरसमज होतो. ते बोलत असलेल्या मुद्द्यावर तिचा गैरसमज होतो. ती म्हणते, तुम्ही इतक्या चांगल्या माणसाला विलन केलंत, आता बस झालं. मला हे सहन होत नाहीय आणि वीणा चक्कर येऊन पडते.' आता पुढच्या भागात नेमकं काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.