
Aai Kuthe Kay Karte Latest Episode Update: ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने अल्पावधितच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. टीआरपीमध्ये नेहमीच अव्वल ठरलेल्या मालिकेची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून टीआरपीमध्ये थोडी मालिका पिछाडीवर पडलेली दिसत आहे. आजच्या भागाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
मालिकेत आतापर्यंत कांचन आजीने एका देवळात भेटलेल्या अनोळखी मुलाला पोटच्या मुलासारखं त्याला सांभाळलं आहे. त्या अनोळखी मुलाची आणि त्यांची काही ओळख नसतानाही त्या त्याला घरी घेऊन आल्या आहेत. ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या आगामी भागात देशमुखांच्या घरी चोरी करण्याच्या उद्देशाने चोर शिरणार आहे. आता कांचन आजी त्या संकटाचा सामना कसा करणार याकडे सर्वच प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. (Entertainment News)
‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या आजच्या भागात कांचन आजी आणि आप्पा घरी एकटेच असतात. त्यावेळी देवळातील अनोळखी मुलगा दोघांनाही आप्पांच्या खोलीतून बाहेर येताना दिसतो. त्याचवेळी कांचन आजींच्या लक्षात येतं, की ही मुलगा चोर आहे. लगेचच कांचन आजींनी त्याला पोलिसात देण्याची धमकी देताना दिसल्या. पोलिसाची धमकी देताच त्या मुलाने कांचन आजींवर धावून गेला. लगेचच त्याच्यावर कांचन आजींनी गरम दुधंच फेकत त्याला काठीने मारतात. नेमका का आरडाओरडा होतोय हे पाहण्यासाठी आप्पादेखील त्यांच्या बेडरूममधून बाहेर येतात. आणि त्याला म्हणतात, “तुला जे हवं ते घेऊन जा... पण आम्हाला काही करू नकोस.” (Marathi Film)
मालिकेत अरुंधती सध्या परदेशी गेल्याने घरातील सर्वच सदस्यांचा हिरमोड झाला आहे. एकीकडे वीणाच्या एन्ट्रीमुळे घरात नवीन वादळांचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे. वीणाने आणि अनिरूद्धने घरातील सर्वच माणसांना सळो की पळो करून ठेवलं आहे, सध्या हे दोघेही आपल्या विशिष्ट शैलीने त्रास देण्याचे काम करत आहे. वीणाला आपलसं करण्यासाठी अनिरुद्ध कुठल्या पातळीवर जाईल याचा काही नेम नाही. आता वीणाचा वापर करुन अनिरुद्ध घरातल्यांसोबत आणखी किती खेळ खेळणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. (Marathi Serial)
नेहमीच टीआरपीमध्ये अव्वल ठरलेली ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या मालिकेचा रेटिंग घसरलेला दिसून येत आहे. ८ पॉईंटच्या पुढे मालिकेचा टीआरपी असतो, मात्र या आठवड्यात मालिकेचा टीआरपी ६.६ इतका आहे. छोट्या पडद्यावरही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली असून यातील कलाकार देखील नेहमीच चर्चेत राहतात. (Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.