
Aai Kuthe Kay Karte Daily Update: नेहमीच टीआरपीमध्ये अव्वल ठरलेली ‘आई कुठे काय करते’ ही मालिका नेहमीच प्रेक्षकांमध्ये चर्चेत असते. प्रेक्षकांमध्ये चर्चेत राहिलेल्या या मालिकेत पुन्हा एक नवा ट्वीस्ट आला आहे. गेल्या आठवड्यात मालिकेत आशुतोषची मामे बहिण वीणा या नव्या पात्राची एन्ट्री झालीय. तिच्या एन्ट्रीनं सुलेखा म्हणजे आशुतोषची आई खूपच आनंदित दिसत आहे. तिच्या एन्ट्रीमुळे आशुतोष- अरुंधतीसह सर्व देशमुख कुटुंबीय काळजीत पडले आहेत.
वीणाच्या नाट्यमय एन्ट्रीने मालिकेमध्ये वेगळंच वातावरण निर्माण झाल्याने सर्वांचीच डोकेदुखी वाढली आहे. तिच्या थेट एन्ट्रीने केळकर कुटुंबालाच खरंतर मोठा धक्का बसला आहे. अखेर आजच्या भागात ईशा- अनिषचा साखरपुडा पार पडणार आहे. त्यामुळे एकीकडे आनंदाचं वातावरण जरी असलं तरी, एकीकडे सर्वांचीच डोकेदुखी वाढली. साखरपुड्यापुर्वी वीणा- अरूंधतीला जाऊन भेटते. त्यावेळी वीणाने तिची फार मोठी फॅन असून तिची भेट घेण्यासाठी ती खूपच उत्सुक असल्याचं सांगते. यावेळी अरूंधती तिला तू इथपर्यंत कशी काय पोहोचली असा सवाल विचारला. त्यावेळी तिने त्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलंय.
ईशा-अनिषचा साखरपुडा झाल्यानंतर भर कार्यक्रमात वीणा सर्वांनाच मोठा धक्का देते. त्यावेळी वीणा सर्वांना सांगते की, तिच्या वडिलांचा व्यवसाय अनिरूद्ध सांभाळतोय त्यामध्ये आता, अनिरूद्ध देशमुख देखील तिचा पार्टनर म्हणून काम सांभाळणार आहे. तिचं हे बोलणं ऐकूण सर्वांनाच काही वेळेसाठी धक्का बसतो. सोबतच ती इतक्या वरच थांबली नाही. वीणा पुढे म्हणते, आता ती मुंबईत राहणार असून ती तिच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळणार आहे. आशुतोषचा व्यवसायातील व्याप बराच वाढला असल्यान ती सुद्धा त्यात लक्ष घालणार आहे. यासाठी अनिरुद्धचा तिनं रितसर इंटरव्ह्यू घेतला असून त्याची निवड बिझनेस पार्टनर म्हणून केलीय.
तिच्या या घोषणेने अनिरूद्धच्या चेहेऱ्यावर आनंद दिसत असून सर्वांच्याच चेहेऱ्यावर मात्र टेंशन दिसतं. सर्वांची चिंता पाहून वीणा म्हणते, मी चुकीच्या वेळी इथे आले का ?, त्यावर सुलेखाताई तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात. त्याचदरम्यान अनिरूद्ध वीणासोबत बोलण्याचा प्रयत्न करतो, पण ती सुद्धा त्याच्यासोबत मी नंतर बोलेल, मला पण तुझ्याशी खूप बोलायचं आहे. असं म्हणून त्याच्यासोबत बोलणं टाळते. वीणाच्या येण्याने ईशाही तिच्या मनातल्या शंका अनिषला बोलते. अनिष ईशाला म्हणतो, आजचा दिवस आपण आपलाच दिवस म्हणून साजरा करू. तर एकीकडे संजना आणि अनिरूद्धचं देखील आपापसात वाद सुरू होतो. तु हे मुद्दाम करतो का?, या मागे तुझा कुटील डाव आहे का?, तू वीणाचा वापर करून आशुतोष आणि देशमुखांच्या घरात मोठं वादळ निर्माण करणार का? असे सर्व प्रश्न आजच्या भागात संजनाने अनिरूद्धसमोर उपस्थित केले.
आजच्या भागात वीणा अनिरूद्धसोबत बिझनेससंबंधीत बोलणार असून तिने घेतलेल्या सर्व निर्णयांबद्दल ती बोलते. सोबतच आता अनिरूद्ध तिला आपल्या बोलण्यात कसे गुंडाळतो हे आजच्या भागात कळणार आहे. आता मालिकेत नेमके काय होणार? वीणाला आशुतोष काय सल्ला देणार या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागातून मिळणार आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.