Aamir Khan: खांद्यावर उपरणं, डोक्यावर गांधी टोपी; आमिरने सपत्नीक केली पूजा, काय आहे पूजेचं नेमकं कारण?

विभक्त झाल्यानंतर सुद्धा आमिर खान आणि किरण राव त्यांनी एकत्र केली कलश पूजा.
Aamir Khan Viral Photo
Aamir Khan Viral PhotoInstagram @advaitchandan

Aamir Khan Performs Pooja: बॉलिवूड अभिनेता आमिर खानने चित्रपटातून ब्रेक घेतला आहे. ब्रेक घेऊन आमिर संपूर्ण वेळ त्याच्या कुटुंबासोबत घालवणार असल्याचे त्याने मागे सांगितले होते. आमिर खानने मुंबई येथील त्याच्या प्रॉडक्टशन हाऊसच्या नवीन ऑफिसचे उदघाटन केले आहे. यावेळी त्याची पूर्वाश्रमीची पत्नी आणि निर्माती किरण राव देखील उपस्थित होती. 'लाल सिंघ चड्डा' या चित्रपटाचे दिग्दर्शक अद्वैत चंदन उद्घाटनाच्या वेळी पूजा करतानाचे आमिर खानचे काही फोटो शेअर केले आहेत.

Aamir Khan Viral Photo
Ram Gopal Varma: राम गोपाळ वर्मा यांनी 'या' पाच हिंदी चित्रपटामुळे गाठले यशाचे शिखर

आमिर खान यावेळी गडद निळ्या रंगाचा स्वेट टीशर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली आहे. तसेच त्याच्या कपाळावर कुंकवाचा टिळा आहे. डोक्यावर गांधी टोपी आणि खांद्यावर उपरणे घेतले आहे. या गेटअपमध्ये आमिर खान कलश पूजन करत आहे. यावेळी किरण राव देखील तेथे दिसत आहे किरण राव हिने ओव्हर साईझ डेनिम शर्ट आणि लेगिन्स घातली आहे. दोघेही एकत्र आरती करताना दिसत आहेत. (Aamir Khan)

अद्वैत चंदन यांच्या या फोटोवर बॉलिवूडमधील कलाकार कमेंट करत आहेत. आमिर खानचा भाचा झाईन मेरी खान याने कमेंट करत म्हटले आहे की, 'मी हा समारंभ मिस केला.' चित्रपट निर्माते आणि लगान चित्रपटाचे एडी सुनील पांडे यांनीं देकील कामनेत केलाय आहे. 'आमचं नवीन ऑफिस आणि हॅशटॅगमध्ये आमिर खान प्रॉडक्टशन्स' असे म्हटले आहे. (Bollywood )

आमिर खान आणि किरण राव त्यांच्या १५ वर्षाच्या संसारातून गेल्या वर्षी विभक्त झाले. असे असूनही मुलगा आझाद राव खान याचे संगोपन एकत्र करण्याचा त्यांनी निरामय त्यांनी घेतला आहे. तसेच दोघंही त्यांचे सामाजिक कार्य सुद्धा सुरू ठेवले आहे. पाणी फाऊंडेशनचे काम दोघेही एकत्र मिळून करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com