आमिर खान तिसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ?
आमिर खान तिसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ?Saam Tv

आमिर खान तिसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ?

काही महिन्यांपूर्वी आमिर आणि किरणचा घटस्फोट झाला होता.

मुंबई - आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या खासगी आयुष्यावरुन चर्चेत आहे. दरम्यान, अमिर तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.आगामी चित्रपट लाल सिंग चढ्ढा प्रदर्शित झाल्यानंतर आमिर आपल्या तिसऱ्या लग्नाची घोषणा करणार आहे अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. काही महिन्यांपूर्वी आमिर आणि किरणचा घटस्फोट झाला होता.

हे देखील पहा -

त्यानंतर आता आमिर तिसरं लग्न कोणाशी करणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. यावरून आमिरला अनेकांनी ट्रोल देखील केले होते.यावर आमिरने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आमिर हा गेल्या अनेक दिवसांपासून फातिमा सना शेखसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, दोघांनीही यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आता आमिर खान तिसरं लग्न कोणाशी करणार याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com