Abhijeet Bichukle In Khupte Tithe Gupte: ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये अभिजीत बिचुकलेंची एन्ट्री, इंग्रजी ऐकून अवधुत गुप्तेलाही हसू आवरेना...

Khupte Tithe Gupte Latest Episode: अवधुत गुप्ते होस्ट करत असलेल्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या आगामी एपिसोडमध्ये ‘बिग बॉस मराठी २’चे स्पर्धक अभिजित बिचुकले हजेरी लावणार आहेत.
Abhijeet Bichukle In Khupte Tithe Gupte
Abhijeet Bichukle In Khupte Tithe GupteSaam Tv

Khupte Tithe Gupte Latest Episode Promo

सध्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या मालिकेची सोशल मीडियावरच नाही तर सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. फार कमी कालावधीतच या कार्यक्रमाने प्रसिद्धी मिळवली आहे. या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत अनेक राजकीय मंडळींनी तसेच अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली आहे. गेल्या आठवड्यात या कार्यक्रमामध्ये अमृता खानविलकरने हजेरी लावली होती. येत्या एपिसोडमध्ये बिग बॉस मराठी २ चे स्पर्धक अभिजित बिचुकलेंनी हजेरी लावली आहे. अभिजित बिचुकले ‘खुपते तिथे गुप्ते’च्या येत्या एपिसोडमध्ये हजेरी लावणार असल्याने सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.

Abhijeet Bichukle In Khupte Tithe Gupte
Amitabh Bachchan Tweet: 'इंडिया'च्या वादादरम्यान अमिताभ बच्चन यांचे ट्वीट चर्चेत, लिहिले - 'भारत माता की जय'

नुकतंच झी मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून आगामी एपिसोडचा टीझर शेअर करण्यात आला आहे. येत्या १० सप्टेंबरला टेलिकास्ट होणाऱ्या या एपिसोडमध्ये अभिजित बिचुकले काय बोलणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. कायमच वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत राहणाऱ्या अभिजित बिचुकलेंची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहे. झी मराठीने हा प्रोमो शेअर करताना, “धारदार प्रश्नोत्तरांना सामोरे जायला आता अभिजीत बिचुकले येणार...पहा, ‘खुपते तिथे गुप्ते’, १० सप्टेंबर, रविवार, ९ वा.” अशा आशयाचं कॅप्शन देण्यात आलं आहे.

Abhijeet Bichukle In Khupte Tithe Gupte
Kareena Kapoor - Kiara Advani: अभिनेत्रीचा तोल गेला अन्... अर्जुन कपूरने सावरलं नसतं तर कियाराचं काही खरं नव्हतं

शेअर केलेल्या प्रोमोमध्ये अभिजित बिचुकले म्हणतात, “आपण असं इंग्रजी म्हणतो ना, कळणार नाही आपण हे शब्द डिक्शनरीत कुठे लिहिलेत, The politics kind of what, struggle of existence” हे वाक्य अभिजित बिचुकले म्हणतात. पुढे टीझरमध्ये, अवधुत गुप्तेने अभिजित यांच्या इंग्रजीचे तोंडभरून कौतुक केलेलं दिसत आहे. सध्या हा टीझर तुफान चर्चेत आला आहे. या येत्या एपिसोडमध्ये अभिजित बिचुकले कोणकोणत्या गोष्टींवर भाष्य करणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

अवधुत गुप्ते होस्ट करत असलेल्या या शोमध्ये आतापर्यंत अनेक राजकीय मंडळींनी आणि अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संजय राऊत, नारायण राणे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार अमोल कोल्हे, उर्मिला मातोंडकर, श्रेयस तळपदे, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर सह काही सेलिब्रिटींनी आणि राजकीय मंडळींनी या शोमध्ये हजेरी लावली आहे. खूप कमी कालावधीतच या शोने प्रेक्षकांकडून पोचपावती मिळवली आहे. या शोला प्रेक्षकांकडून खूप चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. (Serial)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com