
Actor Aditya Singh Rajput Property: प्रसिद्ध अभिनेता, मॉडेल आणि कास्टिंग डायरेक्टर आदित्य सिंग राजपूतचे काल निधन झाले. सोमवारी दुपारी अंधेरी येथील त्याच्या घरात तो बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळला आहे. आदित्यच्या मृत्यूमुळे अनेकांना धक्का बसला आहे.
आदित्यच्या मित्राने सर्वात आधी आदित्यला बाथरुमध्ये पाहिलं. त्यानंतर त्याच्या मित्राने इमारतीच्या सुरक्षारक्षकाच्या मदतीने आदित्यला रुग्णालयात नेले. रुग्णालयातील डॉक्टरांना आदित्यला मृत घोषित केले.
मुंबई पोलीस आदित्य सिंगच्या मृत्यूचा तपास करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार आदित्यचा मृत्यू ड्रग्सच्या ओव्हर डोसमुळे झाला असल्याचे म्हटले जात आहे.
३२ वर्षीय आदित्य सिंग त्याच्या करियरमध्ये यशस्वी होता. आदित्य ४१ कोटीच्या संपत्तीचा मालक होता. दिल्लीत जन्मलेल्या आदित्यने वयाच्या १७व्या करियरची सुरुवात केली होती. आदित्यने त्याच्या करियरची सुरुवात मॉडेलिंगने केली. (Latest Entertainment News)
करियर बनविण्यासाठी आदित्य सिंग राजपूत मुंबईत शिफ्ट झाला होता. आदित्यने अभिनयाची सुरुवात तिने जाहिरातींपासून केली. त्यानंतर तो मालिका आणि चित्रपटांकडे वळला.
आदित्यने त्याच्या करियरमध्ये यू मी ओर हम, क्रांतिवीर, मैंने गांधी को नहीं मारा या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आदित्य सिंग राजपूतने ब्रँड पॉप कल्चरची सुरुवात केली होती. त्यात तो कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम पाहता होता.
आदित्यने 300 हून अधिक जाहिरात व्हिडिओंमध्ये दिसला होता. Splitsvilla या रिअॅलिटी शोमध्येही तो दिसला होता. मैंने गांधी को नही मारा आणि क्रांतिवीर यांसारख्या चित्रपटात त्याने काम केलं होतं. त्याने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती.
आदित्यने 'गंदी बात' या वेबसीरीजमध्येही काम केलं आहे. सध्या आदित्य एका प्रॉडक्शन हाऊससोबत काम करत होता. कास्टिंग डायरेक्टरचं काम करत असल्याने मुंबईच्या ग्लॅमर दुनियेत आदित्यचं मोठं नाव होतं.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.