Bollywood: अक्षय कुमारची राजकारणात हाेणार एंट्री? ताे म्हणाला

या प्रश्नाला अक्षयने दिलेल्या उत्तराने अनेकांचे लक्ष वेधले.
Akshay Kumar News, Bollywood News
Akshay Kumar News, Bollywood News Akshay Kumar Instagram

मुंबई - अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतसोबतच त्याच्या करिअरबाबत चाहत्यांना माहिती देत असतो. राजकारणात येण्यासाठी अक्षय कुमारचे नाव याआधीही चर्चेत होते आणि आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अक्षयने नुकतीच लंडनच्या पल मॉलमधील इंस्टीट्यूट ऑफ डायरेक्टर्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावली. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये अक्षयला राजकारणात प्रवेश कारण्याबाबद विचारण्यात आलं. अक्षय हा राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न या त्याला विचारण्यात आला. या प्रश्नाला अक्षयने दिलेल्या उत्तराने अनेकांचे लक्ष वेधले.(Bollywood News in Marathi)

हे देखील पाहा -

राजकारणात येण्यावर अक्षय काय म्हणाला?

या प्रश्ना उत्तर देत अक्षय म्हणाला की, 'मी चित्रपटांमध्ये काम करुनच खुश आहे. एक अभिनेता म्हणून मी चित्रपटांमध्ये सामाजिक प्रश्न मांडण्याचा माझा प्रयत्न असतो. मी जवळपास 150 चित्रपटांमध्ये काम केले आहे, माझ्या सर्वात जवळचा चित्रपट म्हणजे रक्षाबंधन आहे. मी सामाजिक विषय असलेले व्यावसायिक चित्रपटांची निर्मिती देखील करतो. अक्षयने पुढे सांगितले की तो एका वर्षात सुमारे 3-4 चित्रपटांची निर्मिती करतो.

अक्षयचा लवकरच रक्षाबंधन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आनंद एल राय दिग्दर्शित हा चित्रपट भाऊ आणि बहिणीच्या अनमोल नात्यावर आधारित आहे. अक्षय आणि भूमीचा आगामी चित्रपट हुंडा प्रथेवर एक मोठा संदेश देणार आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

Akshay Kumar News, Bollywood News
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नवी खेळी; पुण्यातही शिंदे गटाची ताकद वाढणार?

दरम्यान, राजकारणाशी संबंधित प्रश्नावर उत्तर देण्याची अक्षय कुमारची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील 2019 मध्ये दिल्लीमध्ये एका कार्यक्रमामध्ये राजकारणाबाबत अक्षयनं त्याचं मत व्यक्त केलं. त्यावेळी अक्षयने सांगितले होते की, 'मला राजकारणात यायाचं नाहीया आहे. मला चित्रपटात काम करायला आवडत. चित्रपटांच्या माध्यमातून मी माझ्या देशाच्या विकासात योगदान देत आहे.हेच माझ काम आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com