अक्षय कुमारला मातृशोक, मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

ती माझं सर्वस्व होती आणि आज मला असह्य दुःख होत आहे. माझी आई अरुणा भाटिया यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला अशा शब्दात अक्षयने आपले दुःख व्यक्त केले आहे.
अक्षय कुमारला मातृशोक, मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
अक्षय कुमारला मातृशोक, मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वासSaam Tv News

मुंबई: बॉलिवुडचा सुपरस्टार अक्षय कुमार याच्या आई अरुणा भाटीया यांचं निधन झालं आहे. मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ती माझं सर्वस्व होती असं म्हणत अक्षय कुमारने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. अरुणा यांच्यावर हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र तब्येत जास्त बिघडल्याने अक्षय फिल्मचं शुटींग सोडून लंडनहून मुंबईत आला होता आणि दोनच दिवसांत त्याच्या आईचं दुःखद निधन झालं. (Actor Akshay Kumar's mother Aruna Bhatia is passes away)

हे देखील पहा -

ती माझं सर्वस्व होती

ती माझं सर्वस्व होती आणि आज मला असह्य दुःख होत आहे. माझी आई अरुणा भाटिया यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला आणि दुसऱ्या जगात तिची वडिलांशी पुनर्भेट झाली. मी आणि माझे कुटुंब कठीण काळात असताना तुम्ही केलेल्या प्रार्थनांचा मी आदर करतो. ओम शांती, अशा शब्दात अक्षयने आपल्या दुःखाला वाट मोकळी करुन दिली आहे.

अक्षय कुमारला मातृशोक, मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
शिवसेना नेते अनिल परब आणि प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

अक्षय कुमारच्या आई अरुणा भाटिया या ७७ वर्षांच्या होत्या. काही वर्षांअगोदर त्यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले होते. अरुणा भाटिया या देखील सिनेमा निर्माते होते. त्यांनी हॉलिडे, नाम सबनम आणि रुस्त या सिनेमांची त्यांनी निर्मिती केली होती. त्यांच्या निधनाने अक्षयचे चाहतेही दुःखी झाले आहेत. अक्षय कुमार त्याच्या सिंड्रेला या सिनेमाच्या चित्रीकरणाकरिता लंडनला होता. आता त्याने निर्मात्यांना शूटिंग चालू ठेवण्यास सांगितले आहे आणि ज्या दृश्यांमध्ये त्याची गरज नाही, ती शूट करायला सांगितली आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com