'डॉन ३' का इंतजार तो...? अमिताभ बच्चन यांच्या पोस्टची तुफान चर्चा, वाचा सविस्तर

अमिताभ बच्चन नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून त्यांच्या नवीन प्रोजेक्टबद्दल माहिती देत असतात, आताही....
'डॉन ३' का इंतजार तो...? अमिताभ बच्चन यांच्या  पोस्टची तुफान चर्चा, वाचा सविस्तर
Amitabh BachchanSaam tv

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (shahrukh khan) एकत्र आले की, सिनेमा सुपरहिट होणार हे मात्र नक्की.'मोहब्बतें'पासून ते 'कभी खुशी कभी गम'पर्यंत कोणताही चित्रपट असो, या सुपरहिट जोडीला पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक असतात. बिग बी अमिताभ बच्चन नेहमीच सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय राहून त्यांच्या नवीन प्रोजेक्टबद्दल माहिती देत असतात. आताही त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एका जुन्या सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. बच्चन यांचा हा सिनेमा ८० च्या दशकात (Don) पडद्यावर झळकला आणि सिनेमा चाहत्यांच्या गळ्यातील ताईतच बनला. तो सिनेमा म्हणजे 'डॉन'.

Amitabh Bachchan
सावधान! मुंबईत कोरोना वाढताच, नव्या रुग्णसंख्येमुळं चिंता वाढली

बच्चन यांचा डॉन सिनेमा सिनेविश्वात प्रचंड गाजला. त्यानंतर या सिनेमाच्या चाहत्यांना डॉन २ ची प्रतीक्षा लागली असतानाच अभिनेता शाहरुख खानने (Shahrukh Khan) पुन्हा एकदा डॉन २ चा थरार प्रेक्षकांच्या भेटीला आणला. या सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमवला. एवढच नाही तर शाहरुखच्या जबरदस्त अभिनयामुळं त्याच्यावर फिल्म इंडस्ट्रीतून कौतुकाचा वर्षावही करण्यात आला. आता तुम्हाला एक प्रश्न नक्की पडला असेल, तो म्हणजे डॉन ३ सिनेमा कधी येणार ? याबाबत बच्चन यांनी अधिकृतपणे घोषणा केली नाही पण त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर त्यांनी याबाबत कल्पना दिली आहे.

अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. सोशल मीडियावर त्यांनी नुकत्याच दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. एका पोस्टमध्ये शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये शाहरुख खान अमिताभ बच्चन यांचा ऑटोग्राफ घेताना दिसत आहे. तर अमिताभ बच्चन 'डॉन' चित्रपटाच्या एका पोस्टरवर सही करत आहेत. हा फोटो शेअर करत अमिताभ बच्चन यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की,'...आणि पुन्हा त्याच जोश मध्ये येत आहे मी...डॉन'. त्यामुळे 'डॉन ३' लवकरच प्रदर्शित होणार, अशा जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

Amitabh Bachchan
.....तर ठाकरे सरकारला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दिला इशारा

याचबरोबर, दुसऱ्या पोस्टमध्ये जुन्या आठवणींना उजाळा देणारा फोटो अमितभ बच्चन यांनी शेअर केला आहे. या फोटोत थिअटरबाहेर सिनेमाच्या अॅडवान्स बुकिंगसाठी प्रेक्षकांनी रांगा लावल्याचं दिसत आहे. अमिताभ बच्चन यांनी या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की,ही रांग माझ्या 'डॉन' या चित्रपटाच्या अॅडवान्स बुकिंगसाठीची प्रेक्षकांनी मोठ मोठ्या रांगा केल्या होत्या.

१९७८ मध्ये प्रदर्शित...४४ वर्षे पूर्ण' अमिताभ बच्चनची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.बच्चन यांनी या दोन पोस्ट शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी पोस्टवर कमेंट्स करत बच्चन यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. तसेच या सिनेमाच पुढचा सिक्वल कधी येणार? याचीही चाहत्यांना प्रतिक्षा लागली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com