अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल; पत्नीने केले मारहाणीचे आरोप

कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याप्रकरणी पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात Alankar Police Station Pune गुन्हा दाखल केला आहे.
अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल; पत्नीने केले मारहाणीचे आरोप
अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल; पत्नीने केले मारहाणीचे आरोपSaam Tv

पुणे - मराठी चित्रपटसृष्टीतील Marathi Film Industry प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासरावसह Aniket VishwasRao त्याच्या आई- वडिलांविरोधात पत्नी स्नेहा चव्हाण Sneha Chavan ने कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याप्रकरणी पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात Alankar Police Station Pune गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील पहा-

अभिनेता अनिकेत विश्वासरावच्या पत्नीने, पती, सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव या तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्नेहाला पती अनिकेतने 10 डिसेंबर 2018 ते 2 फेब्रुवारी 2021 या तीन वर्षाच्या काळात सिनेसृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीच नाव मोठ होईल, या भीतीपोटी वेळोवेळी नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक दिली होती. तसेच तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आला होता असे तक्रारीत म्हंटले आहे.

अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल; पत्नीने केले मारहाणीचे आरोप
बुलढाणा: चिखलीत इलेक्ट्रॉनिक दुकानात सशस्त्र दरोडा; दुकान मालकाचा खून

या संपूर्ण प्रकरणात त्याला त्यांचे सासरे चंद्रकांत आणि सासू अदिती यांनी साथ देण्याचे काम केले. त्या पार्श्वभूमीवर पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून आपला पती अनिकेतसह सासू आणि सासरे यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com