बॉलिवूड अभिनेता सलमान खानला चावला साप

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पनवेलच्या फार्महाउसवर काल रात्री सर्पदंश झाला
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला चावला साप
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला चावला सापSaam Tv

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) सर्प दंश झाल्याचे समोर आले आहे. सलमान खान आपल्या पनवेलच्या फार्म हाऊसमध्ये होता. मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. परंतु, बिनविषारी सापाने चावा घेतल्याने सलमान खानची प्रकृती स्थिर आहे. सलमानला मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले होते. आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्याला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. सध्या अभिनेत्याची प्रकृती ठीक आहे.

पहा व्हिडिओ-

सध्या सर्वत्र ख्रिसमसचे वातावरण आहे. अभिनेता (Actor) सलमान खानसुद्धा (Salman Khan) आपल्या बिजी शेड्युलमधून वेळ काढून ख्रिसमस (Christmas) सेलिब्रेशनकरिता गेला होता. सलमान खान आपल्या मित्रांबरोबर येथे ख्रिसमस सेलिब्रेशन करत होता. त्यांनतर मध्यरात्री अचानक ही घटना घडली आहे. सलमान खानचा उद्या वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्याने चाहतेवर्ग चिंतेत आहेत. सलमान खान सध्या रुग्णालयातून (hospital) फार्महाउसवर परतला आहे. सध्या तो आपल्या तब्ब्येतीची काळजी घेत आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला चावला साप
हार्दिक पांड्याच्या घरी पुन्हा एकदा 'हलणार पाळणा'; लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

सलमान खानचा हा फार्महाउस पनवेल या ठिकाणी आहे. येथे अतिशय घनदाट झाडी आहे. यामुळे येथे सतत जंगली प्राण्यांचा वावर असतो. सलमान खानचा भावजी अर्थातच त्याची बहीण अर्पिता खानचा पती आयुष खानने सांगितले होते, की या फार्म हाऊसवर नेहमीच जंगली प्राणी बघायला मिळतात. सलमान खान सतत आपल्या कुटुंबाबरोबर आणि मित्रांसोबत या फार्महाऊसवर वेळ घालवताना दिसून येतो. लॉकडाऊनमध्ये तो अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत या फार्महाऊसवर राहिला होता. या ठिकाणी शेती करतानाचे आणि मजामस्ती करतानाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com