Salman Khan: सलमान खानला मिळाला शस्त्र परवाना; जिवे मारण्याच्या धमकीनंतर केला हाेता अर्ज

मुंबई पोलिसांनी सलमान खानला स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना जारी केला आहे.
Salman Khan
Salman KhanSaam Tv

मुंबई - अभिनेता सलमान खानला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शस्त्र परवाना दिला आहे. अलीकडेच बॉलिवूडचा दबंग सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर सलमान खानची सुरक्षा कडक करण्यात आली होती. याप्रकरणी 22 जुलै रोजी सलमान खानने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली होती यावेळी सलमान खानने शस्त्राच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. आता या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे.

हे देखील पाहा -

मुंबई पोलिसांनी सलमान खानला स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना जारी केला आहे. धमकीचे पत्र मिळाल्यानंतर सलमान खानने शस्त्राच्या परवान्यासाठी अर्ज केला. सलमानची ही विनंती मुंबई पोलिसांनी डीसीपी झोन ​​9 कडे पाठवली होती. झोनल डीसीपीकडून मंजुरी मिळाल्यानंतर सलमान खानला परवाना जारी करण्यात आला.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानला शस्त्र परवाना जारी करण्यात आला आहे. सलमान कोणते शस्त्र खरेदी करणार याचा उल्लेख नाही. आम्ही सर्व औपचारिक प्रक्रियापूर्ण केल्यानंतर अभिनेत्याला शस्त्र परवाना जारी केला' अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Salman Khan
चिंता वाढली! केरळमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे असलेल्या रुग्णाचा मृत्यू

काही महिन्यांपूर्वी मिळाले होते धमकीचे पत्र

सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमान खानचे वडील सलीम खान हे सकाळी जॉगिंगसाठी गेले होते. तिथे ते एका बेंचवर बसले असता त्यांना एक पत्र मिळालं. ज्यामध्ये त्यांना आणि त्यांचा मुलगा सलमान खानला धमकी देण्यात आली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com