'हिंदू समाज अहिंसक होता, नपुसंक कधी झाला हे कळलंच नाही'

ज्येष्ठ वक्ते शरद पोंक्षे यांनी सावरकरांविषयी आपले विचार मांडले.
Sharad Ponkshe Latest News
Sharad Ponkshe Latest NewsSaam TV

डोंबिवली : 'अहिंसा परमो धर्म: यामध्ये केवळ अर्धाच श्लोक आम्हाला शिकवला गेला. अहिंसा हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि या सर्वश्रेष्ठ धर्माच्या रक्षणासाठी हातात शस्त्र उचलणे हा त्याही पेक्षा मोठा धर्म आहे हे आम्हाला शिकवलं नाही. अहिंसा सारखं दुसर शस्त्र नाही. अहिंसा परमो धर्म: चे एवढे ढोस आम्हाला पाजले की हा हिंदू समाज अहिंसक होता होता नपुसंक कधी झाला हे आम्हाला कळलचं नाही', असे परखड मत सावरकर अभ्यासक शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी डोंबिवलीत मांडले. (Sharad Ponkshe Latest News)

Sharad Ponkshe Latest News
'कर्नाटकात कानडी भाषा...'; मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नसल्याने शरद पोंक्षे भडकले

आम्हाला राग येत नाही, चिड येत नाही. कारण आम्हाला शौर्याचा इतिहास शिकवला. रक्त न सांडता स्वातंत्र्य मिळालं हे आम्हाला खरं वाटते हा घोर अपमान आहे, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले आहे त्यांचाही असे पोंक्षे म्हणाले. स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था डोंबिवली शाखा यांच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन या व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. ब्राह्मण सभागृह येथे रविवारी पार पडलेल्या या व्याख्यानात सावरकर अभ्यासक ज्येष्ठ वक्ते शरद पोंक्षे यांनी सावरकरांविषयी आपले विचार मांडले.

काय म्हणाले शरद पोंक्षे?

'राष्ट्राला सर्व विचारांची गरज असते पण ती तेवढ्याच प्रमाणात. हिंदूस्थान हा हिंदूंचा आहे, यामध्ये कम्युनिझम, समाजवाद हवा तो नसून चालत नाही. पण त्यांचे प्रमाण ठरलेले आहे हे त्या राजाला कळते जो सुसंस्कृत असतो. तो कधी कोणते उपोषण होऊ देत नाही. उपोषण हा कधीच मार्ग नाही उपोषण तेव्हाच यशस्वी होते जेव्हा राजा सुसंस्कृत असतो. सुसंस्कृत राजा असणे म्हणजे काय ? एक प्रभू श्रीरामांचे रामराज्य व दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य असे राज्य चालविणारा राजा असावा असं शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे.

Sharad Ponkshe Latest News
'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिजीत खांडेकर 'या' वेब सीरीजमध्ये दिसणार; पोस्ट शेअर करुन दिली माहिती

'हिंदी राष्ट्रवाद हा अत्यंत घात आहे, मुस्लिम लांघुलचालन हे अत्यंत घातक आहे, हे दोन मुद्दे जोपर्यंत कॉंग्रेस सोडत नाही तोपर्यंत हा सावरकर कॉंग्रसमध्ये कधीही येऊ शकत नाही. आदि विचार मांडत त्यांनी कॉंग्रेस सरकारने हिंदूत्वापासून कसे सगळ्यांना दूर केले, परंतू आता खरे दिवस यायला लागले आहेत असंही ते म्हणाले. 

'सावरकरांचे विचारांनी आपण पुढे जाणे गरजेचे आहे, पण सध्या आपण आपल्या देशासाठी काय करु शकतो याचा विचार प्रत्येकाने केला पाहीजे. प्रत्येकासाठी काही ना काही काम ठरवून दिले आहे, याची उदाहरण त्यांनी सांगितले. तसेच आपला देश स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांनी पोखरला होता. स्वातंत्र्यानंतर भ्रष्टाचाराची जी किड लागली ती एवढी तळागाळापर्यंत जाऊन पोहोचली आहे, ती तळागाळातल्या सामान्य लोकांनीच उखडून टाकायची गरज आहे'.

'देशाला भ्रष्टाचाराची वाळवी लागली असून ती थांबवायची असेल तर सर्वसामान्यांनी पुढे येण्याची गरज आहे. 75 वर्षे अशी गेली, पुढील 75 वर्षाचे हे ध्येय्य असायला हवे, की यामध्ये जो पैसा खाईल त्याला आपण उभच करता कामा नये. आणि त्याची सुवर्ण संधी आपल्या आयुष्यात येते दर ५ वर्षांनी मतदानाच्या रुपाने त्याचा उपयोग करा', असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com