
Sharad Ponkshe News : अभिनेते शरद पोंक्षे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या महापुरुषांवरील वादग्रस्त वक्तव्यावर भाष्य केलं आहे. 'आपल्या देशामध्ये अनेक लोक अनेक महापुरुषांबद्दल अतिशय वादग्रस्त विधान करत असतात. सातत्याने सुरू असते. मला वाटतं या संदर्भात कायदा करावा. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणीही काहीही बोलत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे. कुठल्याच महापुरुषांबद्दल बोललं नाही पाहिजे, असे मत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. (Latest Marathi News)
अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी आज, शनिवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यासहित विविध मुद्द्यावर भाष्य केलं. तसेच पोंक्षे यांनी आज, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
शरद पवारांच्या भेटीवर भाष्य करताना पोंक्षे म्हणाले, 'शरद पवार हे नाट्य परिषदेचे विश्वस्त असून प्रमुख कार्यवाह आहेत. आमची वर्षातून एकदा बैठक असते. नाट्य परिषद भविष्यात कशी पुढे वाटचाल करायची या बद्दल ही बैठक होते. आमच्या परिषदेची कारकीर्द संपली आहे. पाच एप्रिल महिन्यातच आमची कारकीर्द संपते. आता तर डिसेंबर महिना आला आहे. नव्याने निवडणुका घ्यायच्या आहेत. त्या संदर्भात शरद पवारांशी बोलणे झाले'.
जागतिक रंगकर्मी दिवसावर भाष्य करताना शरद पोंक्षे पुढे म्हणाले, 'रंगकर्माचा स्वत:चा हक्काचा दिवस नाही. त्यामुळे प्रदीप करबे यांनी ठरवले असा एक दिवस साजरा करुया. त्यावेळी भालचंद्र पेंढारकर त्यावेळी जिवंत होते. त्यांचा वाढदिवस एका ऋषी तुल्या तपस्वी ज्याला आपण म्हणू शकतो. त्यावेळी २०१४ साली त्यांच्या वाढदिवस यादिवशी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुरस्कार सुरू केला'.
'जास्तीत जास्त कलावंतांनी पुरस्कारानिमित्त यावं आणि आपला हक्काचा दिवस आहे, गाठी-भेटी व्हाव्यात अशी इच्छा आहे. आपल्यामधील एका चाळीस-पन्नास वर्षीय रंगकर्मी यांनी यावं आणि त्यांनी नवीन येणाऱ्या रंगकर्मी यांना या निमित्ताने संदेश द्यावा यासाठी ही कल्पना सुरू केली आहे', असेही पुढे म्हणाले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.